कोल्हापूर सायबर पोलीस ठाणेची कामगिरी
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्ह्यातील सन २०१९ पासून नागरीकांचे वापरणेत येणारे मोबाईल संच गहाळ झाले होते. त्याबाबतचा मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी वअंमलदार यांचेकडून माहिती घेवून आदेशीत केले की, कोल्हापूर जिल्ह्यातून गहाळ झालेल्या मोबाईल संचांचीतसेच चोरीच्या गुन्ह्यात गेलेले मोबाईल संच यांची सायबर पोलीस ठाणे मार्फत तांत्रिक तपासाच्या आधारे
शोध मोहीम राबवून जास्तीत जास्त मोबाईल नागरीकांना परत कसे करता येईल याबाबत सुचना दिल्या होत्या.त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सायबर पोलीस ठाणेकडील पो.उप निरीक्षक श्रीमती कोमल पाटील, पोलीस अंमलदार अमर वासुदेव, सागर माळवे, रविंद्र पाटील, प्रदीप पावरा, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील असिफ कलयगार, सुरेश पाटील यांचे वेगवेगळे पथके तयार करून गहाळ झालेले मोबाईल संच शोधणेकामी नेमणेत आले. नमुद पथकांनी मागील एक महिन्यांमध्ये तांत्रिक तपास करून कर्नाटक राज्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून अंदाजे १५,००,०००/- रू. किंमतीचे १५० मोबाईल संच शोधून ते ताब्यात घेणेत पोलीस पथकास यश आले आहे.
सदरची मोहीम मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले तसेच वर नमूद पथकांनी राबविली आहे. त्यांना सायबर पोलीस ठाणेकडील महादेव गुरव, सुरेश राठोड, सुधीर पाटील,अजय सावंत, सचिन बेंडखळे, विनायक बाबर, दिलीप पोवार, रविंद्र गाडेकर, विशाल पाटील, सुहास पाटील, संगिता खोत, पुनम पाटील, रेणुका जाधव यांनी मदत केली आहे.आज दि. २४/०८/२०२२ रोजी ज्या लोकांचे मोबाईल संच मिळून आले आहेत त्या नागरीकांना मोबाईल संचाची व त्यांचेकडील कागदपत्रांची ओळख पटवून मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पो. उप निरीक्षक कोमल पाटील व सायबर पो. ठाणेचे तपास पथकातील सर्व अंमलदार यांचे उपस्थितीत मोबाईल संच देण्यात आले. नागरीकांना त्यांच्या हरवलेला मोबाईल संच मिळेल असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल संच मिळाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले व तसेच मोबाईल मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या सुचनांनुसार मोहीम सुरू केली असून जून २०२२ मध्ये देखील सुमारे ११,००,०००/- रू. किंमतीचे ११७ मोबाईल संच हस्तगत करून संबंधित मोबाईल धारकांना परत केले आहेत, असे मागील तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे २६,००,०००/- रू. किंमतीचे २६७ मोबाईल संच परत करण्यात कोल्हापूर सायबर पोलीसांना यश आले आहे.सदर कामी मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पथकाचे अभिनंदन करून भविष्यात देखील सायबर च्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त मोबाईल संच नागरीकांना परत करण्याबाबत सुचनादिल्या असून ही मोहीम भविष्यात देखील सतत राबविण्यात येणार आहे.