स्वर्गीय राजीव गांधी यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर, (जिमाका): स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच सद्भावना दिनानिमित्त सद्भावना दिवस प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पोवार, भूसंपादन अधिकारी विवेक काळे तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
कोल्हापूर