गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होणार यात शंका नाही.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये हाेणार असून सभेच्या िनमित्ताने सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमाेर येणार अाहेत. रामायण, महाभारताच्या आरोपावरून वातावरण चांगलेच तापले आहे.गेल्या काही दिवसांपासून गोकुळचे वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. नोंदणी झालेल्या नवीन ४५० संस्था, त्यावरून सुरु झालेले आरोप, प्रत्यारोप या सभेतील कळीचा मुद्दा ठरण्याची दाट शक्यता आहे. गोकुळमधील सत्तांतर आणि गेल्या दोन वर्षांनंतर प्रथमच होत असलेली सभा, या कालावधीमध्ये झालेले आरोप यामुळे गोकुळची सभा वादळी होणार यात शंका नाही.

गोकुळच्या सभेवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून प्रश्नांची आणि आरोपांची सरबत्ती केली जात आहे. हे राजकीय आरोप सुरु असतानाच दहीहंडीपासून रामायण, महाभारतावरून वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी प्रश्नांचा भडीमार केला जाणार आहे. महाडिक गटाकडून खासदार धनंजय महाडिक सभेसाठी हजर राहणार आहेत. पोलिसांकडून सभेसाठी जय्यत तयारी केली असून महासैनिक दरबार हॉल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महासैनिक दरबारमध्ये होणाऱ्या सभेच्या ठिकाणी पार्किंगला सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर हॉल समोरील रस्त्यांवरील वाहने लावता येणार नाहीत. या संदर्भात पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

गोकुळच्या संचालिका शौमिका मडाडिक यांनी सातत्याने विरोधी बाकावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ४५० संस्था वाढल्या आहेत, मात्र संकलनात वाढ झालेली नाही. भविष्यातील निवडणुकांसाठी संस्थांची नोंदणी झपाट्याने सुरू झाली आहे. ज्या संस्था वाढल्या त्यामधून संकलन किती वाढले याचेही उत्तर दिले पाहिजे, नोंदणी केलेल्या संस्था कोणाच्या आहेत याची माहिती दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी संचालक रणजितसिंह पाटील यांनीही सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना दुधाचा दर्जा घसरल्याचे म्हटले आहे.

दहीहंडी कार्यक्रमापासून खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. गोकुळ सभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा सतेज पाटील यांना लक्ष्य केले आहे. गोकुळची वाटचाल शेतकरी संघाकडे होत चालल्याचा आरोप त्यांनी केला. वाढलेल्या संस्था केवळ दप्तरी असून सत्ताधाऱ्यांनी असे करू नये, शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे त्यांनी नमूद केले आहे. सभासदांना योग्य उत्तरे मिळाली नाही तर ही सभा चांगलीच गाजणार आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सभेकडे लागून राहिले आहे.'

विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी आघाड्यांकडून एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील. कोणत्याही प्रकारे सभा गुंडाळली जाणार नाही. शेवटच्या सभासदाचे जोर समाधान होत नाही तोपर्यंत सभा सुरु ठेवली जाईल'.

    -हसन मुश्रीफ, माजी मंत्री

Post a Comment

Previous Post Next Post