सारथी शिष्यवृत्तीसाठी 34 विद्यार्थी पात्र
प्रेस मीडिया लाईव्ह :
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी, पुणे यांचेमार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सन 2020-2021या वर्षापासून सुरू आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील अनेक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. अनेक हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीमध्ये असताना एन. एम. एम. एस. ही स्पर्धा परीक्षा देता येते. यामधून पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना इ. 9 वी ते इ. 12 वी पर्यंत वर्षाला 9600 प्रमाणे चार वर्षे ही शिष्यवृत्ती मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक हातभार मिळतो. शिवाय भविष्यातील अनेक स्पर्धात्मक परीक्षांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीचा पाया या परिक्षेतून बांधला जातो. अनेक विद्यार्थ्यांचं स्पर्धात्मक परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी लागणारे अभ्यासातील सातत्य, परीश्रम, अद्ययावत ज्ञान मिळविण्याची सवय या काळात या परीक्षेमुळे लागते.
श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या तब्बल 34 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले असून सारथी शिष्यवृत्तीसाठी हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यांच्या यशानं शाळेच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या विद्यार्थ्यांना सौ. सविता चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्वच शिक्षकांचे सहकार्य मिळाले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. डी. खोत सर यांचे वेळोवेळी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कर्नल एम. व्ही वेस्वीकर तसेच संस्थेचे अध्यक्ष मा श्रीमंत समरजितसिंह राजे घाटगे आणि मा. श्रीमंत नवोदिता वहिनीसाहेब यांची प्रेरणा मिळाली