प्रेस मीडिया लाईव्ह :
पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांचं महत्त्वं खूप आहे. त्यामुळेच वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन होणं गरजेचं आहे. शालेय परीसरात उपलब्ध असणाऱ्या जागेत स्काऊट आणि गाईड विभागामार्फत मुलांच्या मदतीने वृक्षारोपण तयारी करण्यात आली. वड, पिंपळ, चिंच, उंबर अशा देशी वृक्षांची निवड करण्यात आली. वृक्षसंवर्धनासाठी अगोदरच कुंपण म्हणून सिमेंट गार्डची व्यवस्था करण्यात आली होती. वृक्षारोपण कार्यक्रम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलकर्णी सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. डी. खोत सर तसेच कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
स्काऊट विभागा मार्फत सविता पाटील आणि निलेश सुतार सर यांनी नियोजन केले होते
यावेळी राजे फाउंडेशनचे प्रा.मा.तानाजी सावंत सर, हायस्कूल व प्राथमिकचे सर्व शिक्षकवृंद, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत मा. समरजितसिंह राजे घाटगे यांची प्रेरणा मिळाली