स्टॉलला मोठ्या कुतूहलाने शाळेतील 5 वी ते 10 वी तसेच प्राथमिकच्या जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
सविता पाटील :
विद्यार्थ्यांना घरातीलच साहित्य वापरून राख्या कशा तयार करायच्या याबाबत सौ. सविता पाटील यांनी मार्गदर्शन केले. 5वी ते 7 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुलांनी खूप सुंदर राख्या बनवल्या. या चिमुकल्यांमधून 500 राख्या जमा झाल्या. या राख्यांचा शाळेच्या आवारातच स्टॉल मांडला गेला. आणि या स्टॉलला मोठ्या कुतूहलाने शाळेतील 5 वी ते 10 वी तसेच प्राथमिकच्या जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली.
राखी प्रदर्शनाच्या मागील फलकावर सेहत की राखी तसेच व्यसनमुक्तीचे संदेश लिहिले होते. सर्व विद्यार्थी हे संदेश वाचत होते. या उपक्रमास सलाम बॉम्बे फाउंडेशन तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाचे मार्गदर्शन मिळाले. रक्षाबंधनानिमित व्यसनमुक्तीची शपथ हीच बहिणीला ओवाळणी हा संदेश दिला गेला. कारण तंबाखूच्या व्यसनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले असून याला युवा पिढी बळी पडत आहे. त्यामुळे कुटुंबव्यवस्था व समाजव्यवस्था मोडकळीस येत आहे. यासाठी तंबाखूमुक समाज निर्माण होणे काळाची गरज आहे. म्हणूनच व्यसनमुक्तीचे बीज शालेय दशेतच मुलांच्यात रुजणे महत्त्वाचे आहे. यासाठीच व्यसनमुक्ती प्रचारक सौ. सविता पाटील नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असतात.
या उपक्रमासाठी त्यांना सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. खोत सर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. एम. व्ही वेस्वीकर व मा. कुलकर्णी सर यांचे प्रोत्साहन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्रीमंत समरजीतसिंह राजे घाटगे यांची प्रेरणा मिळाली.