स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : कोल्हापूर महानगरपालिका तर्फे विविध कार्यक्रम; 75 हजार झेंड्यांचे नियोजन

   आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

महापालिका हद्दीतील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी महानगरपालिकामार्फत 75 हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे. तरी महापालिका हद्दीतील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

      अमृत महोत्सवाच्या उपक्रमानिमित्त शाळांमध्ये विविध  स्पर्धा, बचत गट मिळावे, व्याख्यानमाला, स्वच्छता मोहीम याबरोबरच स्वातंत्र्य सेनानी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या महानगरपालिकेच्या वतीने भेटी  घेण्यात येणार आहेत. या महोत्सवाबाबत  विशेष संदेश देणारी चित्रे सुद्धा केएमटी बसेच्या माध्यमातून प्रसिध्द केले जाणार आहेत.  13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या घरोघरी  तिरंगा या अभियानाअंतर्गत महानगरपालिकेने 75 हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे.  यामध्ये विविध संघटनांनी पुढाकार घेतलेला असून विविध संस्था व  कर्मचारी त्यांच्या घरावर तिरंगा लावणार आहेत, अशी माहिती डॉ. बलकवडे यांनी दिली.

      बचतगटाच्या मध्यमातून शहरात तिरंगा राखी स्टॉलच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आली आहे. नागरिकांनी घरोघरी तिरंगा या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा तसेच सामाजिक संस्थानी त्यांच्याकडील नाविन्यपुर्ण संकल्पना महापालिकेस सुचवाव्यात या संकल्पनांचा या अभियानात समावेश केला जाईल, असे ही डॉ. बलकवडे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post