प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी ता. हातकणंगले येथे लोकक्रांती विकास आघाडी (महाराष्ट्र राज्य )याचे वतीने इचलकरंजीतील माजी नगरसेवक मा.श्री.रवींद्र माने यांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाले बद्दल लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच लोकक्रांती विकास आघाडीचे अध्यक्ष मा. श्री.दत्तात्रय मांजरे (तारदाळकर)उपाध्यक्ष मा.श्री नागेश क्यादगी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शोभा वसवाडे कार्याध्यक्ष मा.श्री. दत्तात्रय गोडबोले नगरसेवक भाऊसाहेब आवळे व हज कमिटीचे सदस्य आकाश मुल्ला यानी मनोगत व्यक्त करून रवींद्र माने साहेबांना शुभेच्छा दिल्या. तसेच पिंपळा गणपतीचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री महादेव घट्टे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी लोकक्रांती विकास आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अशोक ठोमके , कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा शबाना, शहा,खजीनदार मुकुंद शेंडगे,जादूगार विलास कांबळे, शशिकला मुनदीनमणी. मच्छिंद्र कांबळे ,राहुल पवार, स्नेहा मिनेगर, इत्यादी मान्यवर व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते