देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, घेणाऱ्याचे हात घ्यावे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : सौ. प्रमोदिनी माने :
आज दिनांक १ ऑगस्ट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्त संविधान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री भरत शिंदे यांच्या पुढाकाराने संत रोहिदास समाज मंडळ अतिग्रे यांच्या मार्फत विद्यामंदिर अतिग्रे शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिल लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. बालवयात शिक्षणाचा श्रीगणेशा करताना आपण दिलेला मदतीचा हात या विद्यार्थ्यांच्या सदैव स्मरणात राहील. त्याचबरोबर या पाटीवर उमटलेली अक्षरे या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी देतील. ज्याचा तुम्हा आम्हा सर्वांनाच अभिमान वाटेल.
लेखन साहित्य वाटप कार्यक्रमासाठी मा. मोहन शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य अतिग्रे ,मा. बाबासो शिंदे , मा.भरत शिंदे , संविधान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ,मा.अरुण शिंदे अध्यक्ष संत रोहिदास मंडळ अतिग्रे,तसेच मा.सुनील शिंदे, मा.संदीप शिंदे, मा.राजू शिंदे सर्व सदस्य संत रोहिदास मंडळ अतिग्रे, मा. संदीप सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य, अतिग्रे तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.