आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाली सुरुवात
प्रेस मीडिया लाईव्ह :
खिद्रापूर- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवहानाला प्रतिसाद देत हर घर तिरंगा घर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जात आहे देशभरात अनेक वास्तूंना रोषणाई केली गेली आहे भारत सरकारच्या व महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने शिरोळ तालुक्यातील कोपेश्वर मंदिराला तिरंगा रोषणाई करण्याचा मान दिला असून याची सुरुवात शनिवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आली .
खिद्रापूर येथील कोपेश्वर हे पुरातन मंदिर तिरंगा रोषणाईने सजले असून नेत्रदीपक रोषणाईमुळे मंदिर उजाळून निघाले आहे मंदिरावर केलेली रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांबरोबर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत, संपूर्ण भारत देशात केवळ दहा ठिकाणी अशी रोषणाई केली असून पर्यटक तसेच शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी सहकुटुंब खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला भेट देऊन ही रोषणाई पहावी असे आवहान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे, यावेळी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्री. चव्हाण त्याचबरोबर खिद्रापूरचे सरपंच हैदर मोकाशी सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.