रिकब पोवारची एमबीएसाठी फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीत निवड



प्रेस मीडिया लाईव्ह :

कणकवली : येथील कु. रिकब विजय पोवार याची एमबीए शिक्षणासाठी जागतिक ३० नंबरचा दर्जा असलेल्या व फ्रान्स मधील ३ नंबरचा दर्जा युनिव्हर्सिटी असलेल्या Emlyon Bussiness college of France येथे निवड झाली आहे. 

त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. रिकबचे प्राथमिक शिक्षण येथील सेंट उर्सुलामध्ये झाले. बी. ई. सिव्हिल ही पदवी प्राप्त केल्यानंतर आता पुढील शिक्षण तो फ्रान्स येथे घेणार आहे. त्यानंतर फ्रान्स येथील Esade किंवा Essec या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करणार आहे. रिकब हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सेवानिवृत्त उपअभियंता विजय पोवार यांचा मुलगा आहे.


Post a Comment

Previous Post Next Post