प्रेस मीडिया लाईव्ह :
जयसिंगपूर : पतसंस्था या ग्रामीण भागातील अर्थकणा असुन सर्वसामान्य माणसाला नियामक मंडळाच्या जाचक अटी मुळे व्यवहार करताना अडचणी येत आहेत. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री सोबत पतसंस्थांच्या समस्या बाबत बैठक घेऊन ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन माजी आरोग्यमंत्री शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी दिले.
नियामक मंडळाच्या अटीमुळे पतसंस्थानी प्रतिवर्षी एकूण ठेवीच्या ००.१० टक्के प्रमाणे अंशदान नियामक मंडळास देणेचा बंधनकारक केले आहे.या अंशदानची रक्कम कोणत्या कारणासाठी करणार आहेत याची निश्चित धोरण नाही.पतसंस्थेकडे व्यवहार करणारा व्यक्ती हा संस्थेचा सभासद असला पाहिजे अन्यथा त्यास व्यवहार करता येणार नाही.अशा अनेक जाचक अटींमुळे पतसंस्थाना व्यवसाय करणे अडचणीचे ठरत आहे.यामुळे शिरोळ तालुका पतसंस्था पदाधिकारीनी आमदार डॉ -राजेंद्र पाटील- यड्रावकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.
या चर्चेवेळी नेमगोडा पाटील (चेअरमन, कल्पद्रुम पतसंस्था हसुर), अशोक पुजारी (चेअरमन, दत्तराज पतसंस्था नृसिंहवाडी),संजय नांदणे(संचालक-क्रांती पतसंस्था कोथळी) शिरोळ तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष - रमेशकुमार मिठारे,जनरल सेक्रेटरी-जयपाल नाईक, खजिनदार -संजय पाटील, संचालक -शशिकांत कांबळे, शशिकांत कोडणिकर, बाबासाहेब पाटील, राजेंद्र तंबाखे आदी उपस्थित होते.