भ्रष्टाचारापासून धर्मांधतेपर्यंतच्या सर्व अनिष्ट बाबी आणि सर्वागीण समता प्रस्थापनेची उक्ती व कृती जोपासणे हीच खरी राष्ट्रभक्ती... प्रसाद कुलकर्णी.



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. १७ , भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, राष्ट्रचिन्ह यासारख्या राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान जपणे,जयघोष करणे निश्चितच महत्वाची गोष्ट आहे .मात्र त्याच बरोबर स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नातला भारत तयार करण्यासाठी कटीबद्ध राहणेही  नव्या पिढीची जबाबदारी आहे.राष्ट्रनिष्ठा ही बाह्यरंगात व्यक्त होण्यापेक्षा ती अंतरंगात सामावलेली असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

भ्रष्टाचारापासून धर्मांधतेपर्यंतच्या सर्व अनिष्ट बाबी आणि सर्वागीण समता प्रस्थापनेची उक्ती व कृती जोपासणे हीच खरी राष्ट्रभक्ती असते असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ,कोल्हापूर संचलित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी  येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य महोत्सव हर घर तिरंगा या अभियानाच्या समारोपात 'भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ' या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रो.डॉ.त्रिशला कदम होत्या. होते.पाहुण्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन केले.स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.धीरज शिंदे  यांनी केले. मंचावर प्रा.संगीता पाटील,प्रा.प्रमिला सुर्वे होत्या.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, स्वातंत्र्य आणि स्व-तंत्र यामध्ये मूलभूत फरक आहे. हुकूमशाही स्व-तंत्र वापरून दमन करते.तर स्वातंत्र्याला लोकशाही अभिप्रेत असते. आपण स्वातंत्र्य चळवळीचे वारसदार आहोत. याचा विसर पडू न देणे फार महत्त्वाचे आहे. कारण राजेशाही, बादशाही, साम्राज्यशाही घालवून आपण लोकशाही स्वीकारलेली आहे. या लोकशाहीसहित सर्व मूलभूत मूल्ये संविधानाने आपल्याला दिलेली आहेत. भारताचा जबाबदार नागरिक म्हणून आणि नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून संविधानिक मूल्ये समाज मानसात रूजवण्याचे कार्य आपण केले पाहिजे.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्या प्रो.डॉ.त्रिशला कदम म्हणाल्या,देश महासत्ता खऱ्याअर्थाने व्हायचा असेल तर समतेच्या चळवळी बलशाली कराव्या लागतील. स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा आणि भारतीय राज्यघटनेने दिलेले तत्त्वज्ञान अतिशय महत्वाचे आहे. त्यातून स्वातंत्र्य कशासाठी व कोणासाठी याबाबतची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. ती भूमिका अधिक सजगपणाने पुढे घेऊन जाणे फार महत्त्वाचे आहे. नव्या पिढीने  पूर्ण क्षमतेने आभार त्यासाठी कटिबद्ध राहीले पाहिजे. प्रा.संगीता पाटील यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.विठ्ठल नाईक यांनी केले.



Post a Comment

Previous Post Next Post