प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी: प्रिटींग व्यवसायासाठी लागणारे कागद व कच्च्या मालाच्या सततच्या दर वाढीमुळे या व्यवसायातील कामासाठी ४० टक्के दरवाढ करण्याचा सर्वानुमते निर्णय प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी या संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.तसेच ग्राहकांनी देखील प्रिटींग व्यवसायातील समस्या समजावून घेवून व्यावसायिकांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
प्रिटींग व्यवसायासाठी लागणारे कागद ,केमिकल ,शाई , पुठ्ठा व अन्य कच्च्या मालाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे.या अस्थिर दरामुळे व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करुन व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.
जगातील पहिल्या तीन मोठ्या उद्योगांमध्ये गणला जाणारा मुद्रण व्यवसाय असूनसुद्धा सतत होत असलेल्या कागद दर वाढीकडे शासन देखील लक्ष देत नसल्याने प्रिटींग व्यवसाय अस्थिर बनून आर्थिक व विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.यावर विचारविनिमय करुन निर्णय घेण्यासाठी प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी या संघटनेची नुकतीच समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात बैठक पार पडली.या बैठकीत प्रिटींग व्यवसायातील विविध समस्यांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.तसेच हा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी व्यावसायिक बंधूंनी संघटीत राहून व्यवसायातील कामासाठी ४० टक्के दरवाढ करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.तसेच ग्राहकांनी देखील प्रिटींग व्यवसायातील समस्या समजावून घेवून व्यावसायिकांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.या बैठकीस अध्यक्ष महादेव साळी ,उपाध्यक्ष सिताराम शिंदे ,सचिव संजय निकम ,खजिनदार कलगौडा पाटील ,सदस्य विनोद मद्यापगोळ ,दीपक वस्त्रे ,नरेंद्र हरवंदे ,राकेश रुग्गे ,स्वप्निल नायकवडे ,गणेश वरुटे ,सुधाकर बडवे ,दीपक फाटक ,रणजित पाटील ,सल्लागार दिनेश कुलकर्णी ,शंकर हेरवाडे ,संतराम चौगुले ,संजय आगलावे तसेच बहुसंख्य मुद्रक बंधू उपस्थित होते.