प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे लिगाडे मळा परिसरातील शंकरराव जाधव विद्या मंदिरमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुणे लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन ध्वजास मानवंदना देण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.तसेच विद्यार्थ्यांनी पथनाट्य व लेझीम कला उत्कृष्टरित्या सादर करुन या कार्यक्रमाची आणखी शोभा वाढवली.
यावेळी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी , निबंध ,चिञकला व वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर ,श्री ईश्वर सेवा मंडळाच्या संचालिका सौ.वर्षा गोरे , लायन्स क्लबचे सदस्य संदीप सुतार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ.गीता पाटील यांच्यासह पालक , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूञसंचालन सचिन वारे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.शिवूडकर यांनी केले.