प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथे अद्ययावत सेंट्रल पार्क हॉटेलचे व्यवस्थापन पाहत असताना ते सर्व बाजूला ठेवून निराधार ,गरीब मुलांसाठी आपली सर्व यंत्रणा लावणारे प्रमोद डोईफोडे यांनी मायेची फुंकर घालत सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवले.
इचलकरंजी येथील नामांकित अशा हॉटेल सेंट्रल पार्कचे व्यवस्थापन पाहणारे प्रमोद डोईफोडे यांनी अब्दुल लाट येथील बालोद्यान या संस्थेतील विद्यार्थी आणि तेथील स्टाफसाठी विशेष योगदान देत त्यांची आत्मीयतेने व्यवस्था करत अगदी सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवले.त्यांनी बालोद्यान मधील मुलांसाठी केलेली व्यवस्था नक्कीच कौतुकास्पद आणि अनेकांना प्रेरणादायी आहे. स्वतः तर या विद्यार्थ्यांसाठी ते राबलेच.परंतु येणाऱ्या अनेक प्रतिष्ठित लोकांना या विद्यार्थ्यांची आणि संस्थेची ओळख करून संस्थेलाही त्यांनी मोठा हातभार लावला. त्यांनी हॉटेलमध्ये आलेल्या एका मित्रपरिवाला याबद्दलची माहिती देताच त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी व अन्य सर्वांचा जो काही खर्च झाला आहे तोही त्यांच्यामुळेच मिळाला. या संस्थेतीलच एका मुलीचा असणाऱ्या वाढदिवसासाठी ही त्यांनी केलेले नियोजन नक्कीच कौतुकास्पद होते.
खरे तर या हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक होते. अशावेळी सुद्धा प्रथम या मुलांना प्राधान्याने सर्व सोयी सुविधा देण्यासाठी ते स्वतः धडपडत होते. त्याचबरोबर त्यांचे असणारे अन्य सहकारीही अत्यंत उत्साहाने या मुलांच्या सेवेसाठी काम करीत होते. केवळ ग्राहक म्हणून नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी जपत प्रमोद डोईफोडे यांनी खरोखरच दिलेली सेवा उपस्थितांना देखील अंतकरण पूर्वक वाटली. हॉटेलचे मालक सुरेश घनशामदास निरंकारी यांनी देखील दिलेले प्रोत्साहन नक्कीच दखलपात्र ठरले आहे.