प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. १६ भारतीय स्वातंत्र्यलढ्याची जात- पात - पंथ निरपेक्ष विचारधारा आणि समाजातील सर्वसामान्य घटकाला विकासाची संधी देणारी आणि माणसाकडे माणूस म्हणून बघणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान समाजमानसात आणि नव्या पिढीत रुजवणे ही काळाची गरज बनली आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या महोत्सवदिनी आपण सर्वांनी त्यासाठी अधिक कार्यरत राहण्याची संकल्प करूया, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि आंबेडकरी चळवळीचे नेते डी.एस.डोणे यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.डी.एस.डोणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शशांक बावचकर, प्रा.रमेश लवटे यांच्या हस्ते' प्रबोधन प्रकाशन ज्योती 'मासिकाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. पांडुरंग पिसे यांनी स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. शशांक बावचकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी तुकाराम अपराध,दयानंद लिपारे ,शिवाजी शिंदे ,धोंडीबा कुंभार ,मनोहर जोशी ,अशोक माने, महालिंग कोळेकर ,शकील मुल्ला,सर्जेराव पाटील,भीमराव नायकवडी आदी उपस्थित होते.प्रा. रमेश लवटे यांनी आभार मानले.