प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य आजादी गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर फेरी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीपासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी पुतळा ते गांधी पुतळा व काँग्रेस कमिटीपर्यंत काढण्यात आली. तदनंतर मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिक निजामुद्दीन काझी यांच्या वीर पत्नी श्रीमती अशरफबी निजामुद्दीन काझी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावचकर यांनी स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेऊन, पुढील 25 वर्षात देशापुढील असणाऱ्या आव्हानांचा उल्लेख केला.तसेच काँग्रेस जणच या देशाच्या उज्वल भवितव्यासाठी निश्चितपणे काँग्रेसचा विचार व देशाची अखंडता ,स्वातंत्र्य , समता, धर्मनिरपेक्षता व बंधुता रुजवण्याचे काम करतील असे मनोगत व्यक्त केले. माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांनी स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचे सांगितले.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब कोतवाल यांनी केले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे,सौ. मीनाताई बेडगे, रहमान खलिफा, प्रमोद खुडे, रविराज पाटील, समीर शिरगावे,राजन मुठाणे, समीर जमादार, रवि वासुदेव, हरूण खलीफा, शेखर पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते , महिला भगिनी उपस्थित होत्या.