प्रमोद परीट यांची शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी निवड

 निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन

प्रेस मीडिया लाईव्ह : 

तारदाळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद परीट यांची शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली‌. या निवडीचे पत्र शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



तारदाळ येथील सामाजिक कार्यकर्ते  प्रमोद परीट यांनी यापूर्वी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देत  सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा क्षेत्रासह  अनेक क्षेत्रातील विविध समस्यांना वाचा फोडून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने करून अन्याय ,अत्याचार पिडित नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.या माध्यमातून सामाजिक विकासात त्यांनी आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटवला आहे. या कार्याची दखल घेत शिवसेनेने त्यांची शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी निवड केली आहे. या निवडीचे पत्र शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले .या पदाच्या माध्यमातून शिवसेना पक्ष अधिक भक्कम करतानाच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रमोद परीट यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी, युवा सेना तालुकाप्रमुख अविनाश वासुदेव, जिल्हा परिषद विभाग प्रमुख शिवाजी भुयेकर, शहर प्रमुख सुनील पाटील, उप शहरप्रमुख विशाल पवार, गौरव जाधव ,युवा सेना अध्यक्ष सचिन भोसले, राहुल पवार, उत्तम पवार, दादासो पवार, सागर कोळी, सुनील भोसले ,किरण खोत ,संदीप माने ,विकास गायकवाड, सुनील शिंदे, संजय वास्कर, उदय कोळी ,सागर नाईक, चंद्रकांत कारंडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post