राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडवणा-या स्वागत कमानीचे उद्घाटन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी/प्रतिनिधी -

येथील वेताळ पेठमध्ये परंपरेनुसार नाले हैदर पंजाची स्थापना करण्यात आली. मोहरम आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचे औचित्य साधत राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडविणारी भव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली आहे. या स्वागत कमानीचे उद्घाटन राज्याचे माजी कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

वेताळ पेठ येथे अनेक वर्षांपासून मोहरम सणात परंपरेनुसार नाले हैदर पंजाची स्थापना करण्यात येते. अत्यंत जागृत व सर्वधर्म समभावाचे प्रतिक मानल्या जात असलेल्या या पंजाची स्थापना यंदा मोठ्या उत्साहात करण्यात आली. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्‍वस्तांच्या वतीने स्वागत कमान बनविण्यात आली आहे. त्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणार्‍या जवानांना सॅल्युट करण्यासह देशातील एकता व अखंडता कायम रहावी यासाठी संदेश देण्यात आला आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही सर्वधर्म समभावाचा मूलमंत्र असाच एकजुटीने जोपासला जावा, असे सांगितले.

याप्रसंगी माजी नगरसेवक मदन कारंडे, राहुल खंजिरे, प्रकाश पाटील, अमित गाताडे, नागेश शेजाळे, सलीम ढालाईत, पंजाचे विश्‍वस्त मन्सुर मुजावर, तौफिक मुजावर, अस्लम मुजावर, सलीम आलासे, इमाम आलासे, अस्लम चौगुले, सुनिल बुचडे, सिकंदर नदाफ, फरहान मुजावर, सोहेल चौगुले, तन्वीर आलासे, हारुण आलासे, सियान मुजावर, समीर कडगे, शकिल आलासे, गौस बैरगदार, मुज्जमिल मुजावर, शोएब चौगुले, यासीन शेख, रिफत आलासे, सरफराज आलासे आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते. आभार श्रीनिवास काजवे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post