लोकक्रांती विकास आघाडीचे वतीने कौतुक विधालयाचे शिक्षकांचा सत्कार
प्रेस मीडिया
हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे :
लोकक्रांती विकास आघाडी (महाराष्ट्र राज्य )याचे वतीने हेर्ले ता. हातकणंगले येथील कौतुक विधालय हेर्ले मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांचा ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देत असल्याबद्दल लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच काही लोकांना व्रक्ष वाटप करण्यात आले तर कौतुक विधालयाचे वतीने
लोकक्रांती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन दिल्लीचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख मा. श्री.दत्तात्रय मांजरे (तारदाळकर) यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रेस मीडिया लाईव्ह पुणे.याचे वतीने *समाजरत्न पुरस्कार* देण्यात आले बद्दल कौतुक विधालयाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
याप्रसंगी शाळेचे व्यवस्थापक सुनील भोसले लोकक्रांती विकास आघाडीचे उपाध्यक्ष नागेश क्यादगी, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा शबाना, शहा,तालुका अध्यक्षा संगीता आवळे, कबनुर अध्यक्षा निशा जमदाडे, उपाध्यक्षा सविता कांबळे, लक्ष्मण पाटील (कर्नाटक )मुकुंद शेंडगे, कौतुक विधालयाचे शिक्षक, शिक्षिका , शिक्षकत्तर कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन सौ ज्योती खोचरे आभार सौ आरती पाटील यांनी केले .
Tags
विशेष वृत्त