ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, शिक्षणतज्ञ केदार सोनी यांची प्रमुख उपस्थिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
डोंबिवली -भारतीय प्राचीन परंपरेतील बुद्धिबळ या खेळाचा प्रसारआणि प्रचार करण्याच्या मुख्य उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या क्रिएटिव्ह नाईट चेस अकॅडमीचे उदघाटन गुरुवार दि. २५ ऑगस्ट रोजी जागतिक दर्जाचे बुद्धिबळ खेळाडू ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या हस्ते होत आहे .
डोंबिवलीतील संगीतावाडी परिसरातील शांतीनगर येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ञ आणि अभिनव विद्यालयाचे संचालक केदार सोनी हे उपस्थित राहणार आहेत.
सदरील अकॅडमी व सेन्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या बुद्धिबळ या खेळाचे प्रशिक्षण देण्यासोबत,खेळाडू घडवणे, विविध स्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक देशपांडे यांनी व्यक्त केला आहे
नवोदित खेळाडूंना बुद्धिबळ क्रीडाक्षेत्रात प्रशिक्षित करणे,अनेक मुलां-मुलींना राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन,तसेच अनेक मोठया स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य क्रिएटिव्ह चेस अकॅडमी व डायनामिक चेस सेंटर करीत आहे.
तारीख,वेळ व स्थान 👇🏻
गुरुवार २५ ऑगस्ट २२
स्थान-👇🏻
८ वा मजला टेरेस,
गजानन हाइट्स,
शांतीनगर,
संगीतावाडी,
डोंबिवली पूर्व
अभिषेक देशपांडे
9167275358
मेल creativeknightchessacademy@gmail.com
facebook.com/creativeknightchessacademy