ग्रामपंचायत शिरढोण मध्ये झालेल्या शासनाच्या विकास निधीचा गैरव्यवहार भ्रष्टाचार उघडकीस , याची सखोल चौकशी करावी व दोषीवर योग्य ती कारवाई



प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

रायगड जिल्हा पनवेल तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायत  श्री. गणेश पशवंत भोपी श्री. योगेश बाळाराम भोपी श्री. सागर चंद्रकांत कर्णेकर यांनी  माहिती अधिकारात शिरढोण  ग्रामपंचायत भ्रष्टाचार उघडकीस याची सखोल चौकशी करावी व दोषीवर योग्य ती कारवाई अशी मागणी करण्यात आली आहे.

पनवेल पंचायत समिती चे बीडीओ  झोपेचे सोंग घेतात का ज्या इंजिनीयरची नेमणूक केली जाते हे अंधारा मध्ये कामे करतात क ग्रामपचायत शिरढोण मध्ये शासनाच्या विकासनिधीचा खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार, भ्रष्टाचार, पैशाचा अपहार झालेला आहे.त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही आपणास ज्या कामामधे गैरव्यवहार झालेला आहे त्याची उदाहरणे माहिती देत आहोत.१) दिनांक २२/०८/२०१९ रोजी ३५०९२६/- (तीन लाख पन्नास हजार नवशे सव्वीस रूपये। रूपये चा वित काढन्यात आलेला आहे काम होते संतोष टकले यांचा घरापासून ते अनंत चोधरी यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे व तेच काम दिनांक ०३/०२/२०२० रोजी संतोष टकले ते भरत चौधरी घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे हे दाखवण्यात आलेले आहे. व त्याचे २८२८६७/-  रूपये एव्हढा बिल काढण्यात आलेला आहे. म्हनजे काम एकदाच झाले आहे पण सहा महीन्याच्या कालावधीत एकाच कामाचे दोन वेळा बिल  काढण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे जे बील काढले आहेत त्या अर्ध्या हून अधिक रस्त्या पेवर ब्लॉक लावलेच नाहीत मग ह्यांनी बिल  कोणता काढला तरी 

 माहीती आम्हाला माहीतीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत निष्पन्न झालेली आहे त्यासंबधातली कागदपत्रे सोबत जोडली आहेत.२) दिनांक २१-३/२०१९ रोजी काम रस्त्यावरील खड्डे भरणे होते. त्याचे ८४२४६/- रुपये एवढे बील श्री. गणेश जनार्दन मुकादम यांच्या नावाने काढण्यात आलेले आहे तसेच दिनांक २३/०८/२०१९ काम रस्त्यावरील खड्डे भरणे होते त्याचे ९६७४८/-  रुपये एवढे बिल श्री महादेव धाऊ घरत यांच्या नावे काढल्यात आलेले आहे माहितीच्या आधाराखाली मागविलेल्या माहिती मध्ये आम्हाला असे दिसून आले आहे की ह्या दोन्ही कामाच्या विलामध्ये लावण्यात आलेली काम करतानाची छायाचीत्रे ( फोटो ) एकाच जागेवरची व एकाच ठिकाणी केलेल्या कामाची आहेत. त्यामध्ये दिसणारी काम करणारी माणसे कामाची जागा व खड्ड्याच्या बाजूता ऊभा असलेला मुलगा दोन्ही तेच आहेत फक्त छायाचीत्रे वेगवेगळ्या जागेवरून काढून ती लावण्यात आलेती आहेत. 

त्यासबंधातील सर्व कागदपत्रे सोबत जोडली आहेत. यामधे असे दिसून येते की काम एकच पण त्याचे विल दोनदा काढण्यात आलेले आहे.३) दिनांक १९/०६/२०१९ रोजी शिरढोन ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनीक शौचालयाला रंगरंगोटी व चित्रे काढने त्यांचे रूपये १,०१,२५४/- (अक्षरी एक लाख एक हजार दोनशे चोपन रुपये) एवढे बिल काढण्यातआलेले आहे.

 परंतु आम्ही मागविलेल्या माहितीच्या अधिकारात असे निदर्शनास आले आहे की ग्रामपचायत हद्दीत कोणतेही सार्वजनीक शौचालये नाहीत म्हणजे हा सर्व उघड उघड भ्रष्टाचार आहे.४) वर्ष २०१८-२०१९ व २०१९-२०२० या वर्षासाठी शासनाकडून १४ व्या वित्त आयोग या योजने अंतर्गत जवळ -जवळ ३२,००,०००/- (अक्षरी बत्तीस लाख रूपये) रुपये एवढा निधी ग्रामपंचायत शिरढोण च्या खात्यात जमा करण्यात आला होता या कालखंडात आपल्या देशावर कोरोना सारख्या महामारीचे संकट आते होते त्यामुळे ह्या कालखंडात विकासकामे झालेली नाहीत म्हणजे निधीचा पूर्णपणे वापर ही झालेता नाही आम्ही मागविलेल्या माहितीच्या आधाराखतील माहीतीमध्ये असे निदर्शनास आले आहे की १४ वे वित्त आयोग या योजनेसाठी आलेल्या संपूर्ण निधीपैकी फक्त ११ ते १२ लाख रूपये वापरण्यात आलेले आहे वाकी पैशाचा कोणताही हिशोब दिसत नाही परंतु त्या निधीसाठी वापरण्यात येणाऱ्या बँक ऑफ इंडिया बँकेच्या खात्याची स्टेटमेंट पाहिली असता असे समोर आले की ह्या खात्यातून बराच पैसा हा बऱ्याच लोकांच्या नावे अनामत रक्कम म्हणून काढण्यात आलेला आहे.

 व त्याबाबत सरपंच व ग्रामसेवक वासुदेव पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहीती आम्हास दिलेली नाही म्हणजे जवळ जवळ रू.२०,००,०००/- (अक्षरी वीस लाख रुपये ) रुपयेचा गैरव्यवहार, भ्रष्टाचार दिसून येतं आहे व झालेल्या बाकीच्या कामात सुद्धा गैरव्यवहार दिसून येत आहे.

 ते असे की केलेल्या कामाचे मूल्यांकन जास्त करुन विल काढलेले आहे व काय कमी झालेले आहे असे ग्रामस्थांना दिसून आलेले आहे त्याचीही आपण चौकशी करावी, सोबत माहितीच्या अधिकाराखाली १४ व्या वित्त आयोग वर्ष २०१८-२०१९ व २०१९-२०२० या वर्षात झालेल्या कामांच्या माहितीचे कागदपत्र जोडले आहेत.

 या सर्व गैरव्यवहारात आम्हास असे समजले की पंचायत समीती पनवेल मधील काही अधिकारी सुध्धा ह्यात सामील आहेत.त्यामुळे महोदय आम्ही ग्रामस्त शिरढोण आपणास विनंती करत आहोत की शासनाकडून देण्यात आलेल्या १४ व्या वित आयोग व ग्रामनिधी घ्या विकासनिधीमधे खूप गैरव्यवहार व खूप मोठा भ्रष्टाचार झालेला दिसून येते आहे त्यामुळे या सर्व गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून आपण यामधे दोषी असणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत आणि पंचायत समीती अधिकारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी आपल्याकडून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अपेक्षा आहे आणि ती तुम्ही कायदेशीर रित्या पूर्ण कराल हि अपेक्षा तसे जर घडले नाहीं तर आम्ही ग्रामस्थ प्रसार माध्यमांचा सहकार्य घेवुन तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील कारवाई चालु करु हि विनंती कळावेकळावे,श्री. गणेश यशवंत भोपी श्री. योगेश बाळाराम भोपी  श्री. सागर चंद्रकांत कर्णेकर

Post a Comment

Previous Post Next Post