प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील :
मार्च 2021 मध्ये गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत गुरन 17/2021 कलम 454, 457,380 भादवी प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता .मा.एसपी सरांच्या आदेशाने त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला होता.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला तो गुन्हा उघडकीस करण्यात यश मिळाले असून त्या मध्ये खालील तीन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे त्यांचे अधिकचे तपासामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील खालील एकूण सहा घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपी
1)अलेक्सझेंडर मरियाराज देवेंद्र वय 46 रा.खोली नंबर 12 नायगाव ईस्ट ता.वसई
2)मकसूद मोहम्मद मुकादम वय 40 रा.जस नाईक मोहल्ला भोस्ते ता.खेड जिल्हा रत्नागिरी
3)रहिमतुल्ला इब्राहिम डावरे वय 55 रा.दहिवली ता. मानगाव जि.रायगड
उघडकीस आलेले गुन्हे
1) गोरेगाव पोलीस ठाणे सीआर नंबर 17/2021 कलम 454 457 380
2)कर्जत पोलिसा ठाणे सीआर नंबर 279/2021 कलम 454 457 380
3)कर्जत पोलिस ठाणे सीआर नंबर 285 2021 कलम 454 457 380
4)कर्जत पोलीस ठाणे सीआर नंबर 293 2021 कलम 454 457 380
5)कर्जत पोलिस ठाणे सीआर नंबर 313 2019 कलम 454 457 380
6)कर्जत पोलीस ठाणे सीआर नंबर 252 2022 कलम 454 457 380
आरोपींचा पूर्व इतिहास
अटक आरोपी अलेक्झांडर मरिया राज देवेंद्र यांच्याविरुद्ध यापूर्वी मुंबई शहर हद्दीत घरफोडीचे आठ गुन्हे दाखल आहेत
आरोपी मकसूद मोहम्मद मुकादम याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे अंबरनाथ येथे फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे
हस्तगत मालमत्ता
अटक आरोपीकडून उघडकीस आलेल्या वरील सहा गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या एकूण प्रॉपर्टी पैकी 87% प्रॉपर्टी हस्तगत करण्यात आली आहे त्यामध्ये 287.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2600/- रुपये असा एकूण 9,55,135/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे*
ही कामगिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पीएसआय महेश कदम, पोलीस हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे, देवराम कोरम तसेच सायबर सेलचे अक्षय पाटील आणि तुषार घरत यांनी केली आहे....