इचलकरंजीत अतिक्रमण मोहीम तीव्र ; कोण अतिक्रमण करील गुन्हा दाखल करा ; आयुक्त देशमुख



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी शहरामध्ये अतिक्रमण मोहीम तीव्र करण्यात आली महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ येऊन धडक कारवाई केली इचलकरंजी शहरहे अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिले आहेत जे कोण पुन्हा अतिक्रमण करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असा इशारा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिला आहे.


इचलकरंजी शहर हे महानगरपालिका झाल्यापासून नवचर्चित आयुक्त सुधाकर देशमुख यांनी इचलकरंजी शहर हे राज्यातील मॉडेल शहर बनले पाहिजे या अनुषंगाने शहरातील डेक्कन चौक ते नदीवेस नाका कोल्हापूर नाका ते सांगली नाका या परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे अतिक्रमण मोहीम गेल्या महिनाभरापासून काढण्याचे सुरू आहे पण व्यापारी पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण करत आहेत आज आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शाहू पुतळा परिसरात येऊन अतिक्रमण मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या .

तसेच A S C कॉलेज शाहू पुतळा परिसर डेक्कन चौक फळ मार्केट मधील अतिक्रमण काढण्याच्या सक्त सूचना दिल्या त्या अतिक्रमण मोहीम तीव्र करण्यात आली व्यापारी विक्रेते फुटपाथवर अतिक्रमण करायचं नाही रोजचे आपला व्यवसाय झाल्यानंतर तेथे असणारे हातगाडे ठेवायचे नाही ते रोज आपल्या घरी घेऊन जायचे अशा सक्त सूचना अतिक्रमण प्रमुख सुभाष आवळे यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे आज अतिक्रमण काढत असताना नगरपालिकेचे कामगार अधिकारी विजय राजापुरे अतिक्रमण प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी सुमारे शंभर कर्मचारी अतिक्रमण काढण्यास सामील झाले होते ते अतिक्रमण मोहिमला विरोध करतील त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिल्या आहेत

Post a Comment

Previous Post Next Post