( Api ) दिलीप पवार पोलीस अधिकाऱ्याच्या गावातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी मोकाट फिरत आहे



प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी 

भिगवण: महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करणार असे म्हणनारे (Api ) दिलीप पवार पोलीस अधिकाऱ्याच्या गावातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी मोकाट फिरत असून  पोलीस त्याला अटक करत नाहीत याचेच आश्चर्य वाटते.

 


 13 जुलै रोजी गुन्हा दाखल होऊन ही आजपर्यंत आरोपीला अटक झालेला नाही विशेष म्हणजे म्हणजे आरोपी गावातच मोकाट फिरत आहे याचा अर्थ सरळ सरळ निघतो की या मागे कोण्या मोठ्या व्यक्तीचा  हात आहे , दुसरी गोष्ट म्हणजे पुढाऱ्याच्या दबावाखाली पोलीस अधिकारी आहेत की आणखी काही कारण आहे  ?  हे एक न उलगडणारे कोडे आहे .

   जे पोलीस अधिकारी 2 आगष्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगतात की "मी महिलांना सुरक्षित वातावरण  निर्माण करणार असल्याची अशी ग्वाही देतो  सांगून" तोच अधिकारी भिगवण मधील आरोपीला अटक न करता त्या केस कडे लक्ष देत नाही,तर महिलांना सुरक्षा काय देणार ?  असे असेल तर महिला सुरक्षित राहण्या ऐवजी महिलांवर अन्याय अत्याचार होण्यास भर दिला जात असल्याचे दिसत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post