प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड : सुनील पाटील
शालेय विद्यार्थ्यांना दप्तर छत्र्यांचे वाटप रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांभार्ली येथे करण्यात आले
बीइंग गुड फाउंडेशनच्या : ● अध्यक्षा सौ. वैजयंती ठाकूर आणि उपाध्यक्ष तुषार ठाकूर, तसेच फाउंडेशनचे सदस्य महेंद्र ठाकूर, सदस्य प्रमोद जांभळे, भानुदास • पाटील यांच्या हस्ते चाळीस • विद्यार्थ्यांना छत्र्या आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले. बीइंग गुड ● फाउंडेशनच्या वतीने रसायनी पाताळगंगा परिसरातील जिल्हा • परिषद शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना - छत्र्या व दप्तरांचे वाटप सुरू केले आहे. वासांचे मोहोपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना या अगोदर वाटप करण्यात आले आहे. यावेळी शालेय शिक्षक हसुराम मोतीराम पाटील, कल्याण भिकाजी चिलवंत, विद्या संजय पाटील, संगीता संजीव म्हेत्रे यांचे विशेष सहकार्य लाभले