शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी ५१ कोटीचा निधी मंजूर

 आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती

प्रेस मीडिया लाईव्ह :

जयसिंगपूर-शिरोळ तालुक्यातील गावा गावांना जोडणारे रस्ते, ग्रामीण जिल्हा व राज्य मार्ग दुरुस्ती करणे त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूने गटर्स बांधणे यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील गावागावांना जोडणारे रस्ते खराब झाले होते त्यामुळे नागरिकांना दळणवळण करणे अथवा शेती व अन्य सामग्रीची वाहतूक करणे अडचणीचे व त्रासाचे ठरत होते त्यामुळे या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन मिळावा व त्यासाठी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनांमधील पुरवणी अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागणी यादीत  निधीची तरतूद व्हावी अशी आपण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे  मागणी केली होती, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागणी यादीत ५१ कोटी रुपयांचा निधीची तरतूद शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी झाली आहे, लवकरच या कामांच्या निविद्या प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हंटले आहे, निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत, शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहराबाहेरील वळण मार्ग मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यासाठी ४ कोटी, शिरदवाड, अब्दुललाट हेरवाड रस्ता मजबुतीकरणासह सुधारणा करणे २ कोटी ५० लाख, टाकवडे, शिरढोण, मजरेवाडी, अकीवाट, टाकळी व खिद्रापूर रस्ता दुरुस्त करणे व गटर्स बांधणे १ कोटी ५० लाख, यड्राव, जांभळी, हरोली, नांदणी धरणगुत्ती,व शिरोळ रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करणे २ कोटी ८५ लाख, अब्दुललाट, लाटवाडी, घोसरवाड, दत्तवाड,व दानवाड रस्त्याची दुरुस्ती व आरसीसी गटर्स बांधणे २ कोटी ५० लाख, तमदलगे, निमशिरगाव जैनापुर ऊदगांव रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरणासाठी १२ कोटी रुपये, नरसिंहवाडी औरवाड, कवठेगुलंद माळ गणेशवाडी ते राज्यहद्द ला मिळणारा रस्ता सुधारणा करणे १० कोटी रुपये, जयसिंगपूर रेल्वे स्टेशन, उदगांव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसुर ते शिरोळ रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे २ कोटी रुपये, यड्राव, जांभळी, हरोली, नांदणी ते शिरोळ रस्ता १ कोटी ५० लाख, टाकळी, टाकळीवाडी, दत्तवाड ते राज्य हद्दीपर्यंतचा रस्ता सुधारणा करणे व गटर्स बांधणे १ कोटी रुपये, टाकवडे, नांदणी, आडकेवाडी ते राज्य मार्ग क्रमांक २०० ला मिळणारा रस्ता सुधारणा करणे २ कोटी ५० लाख तर यड्राव नाका जांभळी हरोली नांदणी धरणगुत्ती शिरोळ ते राज्य मार्ग १४२ ला मिळणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे यासाठी ७ कोटी, तसेच प्रजिमा ३८ पासून टाकळी, दानवाड ते राज्य हद्दीपर्यंत रस्ता सुधारणा करणे १ कोटी इतक्या रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एप्रिल 2022 मध्ये रस्ते दुरुस्तीसाठी मिळालेले २८ कोटी रुपये व सध्या पुरवणी मागणी मधून मंजूर ५१ कोटी रुपये असा एकूण शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी यावर्षी ७९ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी सांगितले आहे, मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या निधीमुळे तालुक्यातील रस्ते मजबूत होणार असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हंटले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post