कोल्हापूर : गेल्या 24 तासांमध्ये नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 10 फुटांनी वाढ

प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली.


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : गेल्या 24 तासांमध्ये नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 10 फुटांनी वाढ झाली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी साडी 24.5 फुटांवरजा ऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील अनेक मार्ग संततधारेमुळे बंद झाले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आठ जुलैपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस होत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने अनेकांचे डोळे आभाळाकडे लागले होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेल्या दमदार पावसाने शेतकरी वर्ग सुखावला गेला आहे.

पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

  • हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता

  • मध्य महाराष्ट्रात 7 जुलै रोजी मुसळधारेचा अंदाज

  • कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

  • कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

  • उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Post a Comment

Previous Post Next Post