प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे अनेकांचे स्टेट बँकेत खाते असते. तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बँक खाते आहे का. ? जर याचे उत्तर होय असेल, तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. आता तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करू शकणार नाही. स्टेट बॅंकेद्वारे बॅंकेत पैसे जमा करण्याच्या नियमात आता बदल करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, आता तुमच्याकडे ग्रीन कार्ड असेल, तरच तुम्ही बँक खात्यात पैसे जमा करू शकाल, नाहीतर तुम्हाला स्टेट बॅंकेत पैसे जमा करता येणार नाहीत.
काय आहे स्टेट बॅंकेचा नवा नियम...
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमांनुसार, आता बँक ग्राहकांकडे एसबीआय ग्रीन कार्ड असणे आवश्यक आहे. जर त्यांच्याकडे हे कार्ड नसेल तर बँक त्यांच्या खात्यात पैसे जमा करता येणार नाही. अशा परिस्थितीत त्यांना जवळच्या एटीएम केंद्रात जाऊन क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे जमा करावे लागतील. जर त्यांना कोणत्याही कारणास्तव बँकेत पैसे जमा करायचे असतील तर त्यांना बँकेत जाऊन एसबीआय ग्रीन कार्डसाठी अर्ज करावा लागेल. जोपर्यंत हे कार्ड बनत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे जमा करता येणार नाहीत.
SBI ग्रीन कार्ड काय आहे ?
बँकेने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार, एसबीआय ग्रीन कार्ड हे क्रेडिट किंवा डेबिट कार्डसारखेच ग्रीन कार्ड देखील आहे. ज्यामध्ये बँक खातेदाराची संपूर्ण माहिती असते. हे कार्ड मशीनमध्ये स्वाइप होताच ते ग्राहकाचे खाते उघडते. हे कार्ड बनवण्यासाठी बँकेत 20 रुपये शुल्क भरावे लागेल.
एसबीआय ग्रीन कार्डच्या मदतीने पैसे कसे जमा करायचे ?
जेव्हा तुम्ही स्टेट बँकेत पैसे जमा करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला हे कार्ड सोबत घ्यावे लागेल. तेथे बँक कर्मचारी हे कार्ड मशीनवर स्वाइप करेल. यानंतर, तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती संगणकावर दिसेल आणि तुमचे खाते उघडले जाईल. त्यानंतर बँक कर्मचारी त्या खात्यात पैसे जमा करेल. काही मिनिटांतच तुमच्या खात्यात जमा झालेले पैसेही दिसायला लागतील.
स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील किमान व्याजदर 7.55 टक्के केला आहे. नवे दर अलीकडेच लागू झाले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवून 4.90 टक्के केला आहे. यानंतर अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. मे महिन्यातही मध्यवर्ती बँकेने रेपो दरात अचानक 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती.