प्रेस मीडिया लाईव्ह :
टाकवडे- शिरढोण मार्गावर पावसाळ्यात ठिकठिकाणी शेतात पाणी साचते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी मोन्याही बांधल्या आहेत. मात्र त्यामध्ये मोठ्याप्रमाणात गाळ साचुन त्या मोन्यातून पाण्याचा निचरा बंद झाल्याने सुमारे ४० एकर शेतीचे नुकसान होत होते.पाण्यामुळे बाधीत होणाऱ्या या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर कार्यालयात आपले गार्हाणे मांडले. याची दखल घेऊन पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने मोऱ्या प्रवाही करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
इचलकरंजी - कुरूंदवाड मार्गावरील शिरढोण टाकवडे दरम्यान दरवर्षी पावसाळ्यात शेतात मोठ्याप्रमाणात पाणी साचते. शेतीच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सार्वजनिकबांधकाम विभागाने ठिकठिकाणी मोन्या बांधल्या असल्या तरी त्या मोन्यामध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी लक्ष्मी मंदिर ते हनुमान बेकरी या दरम्यानच्या ४० एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांचे गेल्या २० वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतक-यांनी संघटीतपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जयसिंगपूर कार्यालयात जाऊन आपले गान्हाणे मांडले.
या बाबत अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली आणि पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने मोन्या प्रवाही करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.