पाटण तालुक्यातील खुडपुले वाडी रस्ता वाहतुकीसाठी सुरु

खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जितकरवाडी गावातील नागरिकांचे स्थलांतर

      प्रांताधिकाऱ्यांनी दिली गावांना भेटी  

 सातारा दि. 11 : पाटण तालुक्यातील काटे अवसरी परिसरातील खुडपुले वाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर भुसख्खलन झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रांताधिकारी सुनिल गाडे यांनी भेट देवून एकेरी रस्ता सुरू केला यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करुन तेथील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असून आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

ग्रामस्थांपैकी 4/5 कुटुंबांना घरकुल मंजूर झाल्याचे  ग्रामस्थांनी भेटी प्रसंगी सांगितले. यावर श्री. गाडे यांनी  मंजुर घरकुलांची कामे तातडीने सुरु करण्याच्या  गटविकास अधिकारी यांना  सूचना दिल्या आहेत.

वांग मराठवाडी धरणाच्या बॅक वॉटर ला , नदीच्या पलीकडे जितकरवाडी आहे. त्याठिकाणी 20 ते 22 कुटुंब राहत आहे . GSI च्या सर्व्हे नुसार त्यांचे कायमचे पुनर्वसन प्रस्तावित केले असून  प्रस्तावात  शासनाकडे  पाठविण्यात आला आहे.  सध्या पाऊस सुरू असल्याने  वरच्या बाजूला डोंगरावर एक भेग असल्याने त्याठिकाणी भुसख्खलन होण्याची शक्यता असल्याने  खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना जिंती येथील शाळेत तात्पुरत्या स्वरूपात ग्रामस्थांच्या मागणीनुसार  स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांना प्रशासनामार्फत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही श्री. गाडे यांनी सांगितले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post