सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील दरडी हटविण्याचे काम

 वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाय योजना


प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा दि. ११ : सातारा जिल्हात पाटण, महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर दरडी कोसळ्ण्याचे प्रकार समोर येत आहे.  सार्वजनिक बांधकाम विभाग याची तात्काळ दखल घेऊन दरडी हटविण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेऊन  वाहतुक सुरळीत करीत आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने  यंत्र सामुग्री सज्ज ठेवली आहे.

जुलै-२०२२ मध्ये या मंडळाअंतर्गत येणाऱ्या महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण, कराड, सातारा,  खंडाळा या तालुक्यांमध्ये आठवड्याभरात बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली आहे. महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण या तालुक्यांमध्ये मागील ४ दिवसामध्ये प्रतिदिन सुमारे १०० ते २१३ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. पावसाळ्यातही  रस्ते सुस्थितीत ठेवणेसाठी शासनस्तरावरून वार्षिक देखभाल दुरूस्तीचा कार्यक्रम मंजूर झालेला आहे. या वर्षीच्या   पावसाळ्यात दरडी पडणे, झाडे उन्मळुन पडणे, पुल व मोऱ्यांमध्ये दगड-धोंडे, झाडे अडकणे, तसेच पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे भरणे इत्यादी कामे तात्काळ हाती घेण्यात येऊन रस्ता वाहतुकीस सुस्थितीत ठेवला जात आहे.

  पावसाळा सुरु झाले पासून रस्त्यांवर दरड पडणे, झाडे उन्मळुन पडणे या घटना वारंवार घडत आहेत. त्याअनुषंगाने वार्षिक देखभाल दुरूस्ती अंतर्गत नेमण्यात आलेल्या ठेकेदाराकडून तात्काळ कामे पूर्ण करून घेऊन रस्ता वाहतुकीस तात्काळ खुला करण्यात येत आहे. त्यामध्ये मुख्यत: खालील रस्त्यांचा समावेश आहे.

  महाबळेश्वर तालुक्यामधील  प्रतापगड कुंभरोशी कळमगाव तापोळा अहिर रस्ता, पोलादपुर महाबळेश्वर वाई वाठार भाडळे राजापुर दहिवडी रस्ता, बुरडानी कोट्रोशी बंदर रेणोशी दोडाणी रस्ता,   चतुरबेट दाभे दाभेघर खरोशी रूळे आकल्पे उचाट मेटशिंदी ते जिल्हा हद्द रस्त्यांवर दरड कोसळली असता ती तात्काळ हटविण्यात आली आहे.

  वाई तालुक्यामधील  पोलादपुर महाबळेश्वर वाई भाडळे दहिवडी रस्ता, पसरणी घाट, पारगांव यवत सासवड कापुरहोळ भोर मांढरदेव वाई सुरुर रस्ता, जोर वाई पाचवड मेढा रस्ता,  वाई जांभळी वाशिवली वासोळे आकोशी वयगांव बलकवडी फाटा ऊळूब जोर धनगरवाडा कात्रटवस्ती रस्ता

जावली तालुक्यामधील  महाबळेश्वर मेढा सातारा रहिमतपूर पुसेसावळी विटा रस्ता, मेढा (वेण्णा चौक) कुसुंबी सह्याद्रीनगर केळघर फाटा अंधारी मुनावळे वाघळी शेंबडी बामणोली, सातारा कास बामणोली गोगवे तापोळा महाबळेश्वर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग,  भिलार उंबरी धावली आलेवाडी खिंड रेंडीमुरा कुंभारगणी मोरखिंड जननीमाता मंदीर मोरावळे रस्ता, पाटण तालुक्यामधील पाटण मणदुरे रस्ता, कसणी निगडी रस्ता,  पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता, निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता   कराड तालुक्यामधील  राज्यमार्ग क्र. १३६ ते तांबवे दक्षिण तांबवे डेळेवाडी अंबवडे कोळेवाडी तुळसण उंडाळे जिंती रस्ता डेळेवाडी खिंड इत्यादी ठिकाणी दरडी कोसळत असतात या सर्व ठिकाणी जेसीबी, प्रोकलेन,टिपर,ट्रॅक्टर इ. यंत्रसामुग्री आवश्यकतेनुसार सज्ज ठेवण्यात आलेली असून रस्ते वाहतुकीस बंद पडल्यास कामे तात्काळ पूर्ण करण्यात येवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे.


ताज्या बातम्या घडामोडी वाचा

पुणे मेट्रो लाईव्ह : मराठी व हिंदी भाषेत.

pmetrolive.blogspot.com 

Post a Comment

Previous Post Next Post