तुम्ही ब्लू फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि त्याचं उत्तर मागाल, असं कुठे करतात का चित्रा ताई..? रुपाली ठोंबरे




प्रेस मीडिया लाईव्ह :

 भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांचा महिले सोबतचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. चित्रा वाघ यांनी अशा प्रकारे एखाद्याच्या खासगी व्हिडीओ बाबत शहानिशा न करता सोशल मीडियावर शेअर करणे चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं जात होतं.दरम्यान त्यांनी व्हिडीओ ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस मधूनही पलटवार सुरू केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी चित्रा वाघ यांनाच सवाल उपस्थित केला आहे. तुम्ही ब्लू फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि त्याचं उत्तर मागाल, असं कुठे करतात का चित्रा ताई? असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला आहे.

तो व्हिडीओ खरा आहे की, खोटा आहे याबाबत पडताळणी केली का? याशिवाय श्रीकांत देशमुख यांच्या व्हिडीओच्या वेळी कुठे होता? आता तर संजय राठोडही तुमच्याकडे आले आहेत. नाना पटोले यांनी आयपीसीनुसार, वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असंही त्यांनी यावेळी सुचवले.उद्या तुम्ही ब्लू फिल्म टाकाल”
“या गोष्टी पाळल्या पाहिजेत. उद्या तुम्ही ब्लू फिल्म टाकाल आणि याचं उत्तर द्या म्हणाल. ज्या महिलेवर अन्याय झाला आहे त्याची तपासणी करून तिला न्याय द्या. मात्र, राजकारणासाठी असं वागणं करू नये असं मी चित्रा वाघ यांना सांगेल,” असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं.

रुपाली ठोंबरे पुढे म्हणाल्या, “चित्रा वाघ या दुटप्पी भूमिका घेत आहेत. भाजपाच्या श्रीकांत देशमुख यांचे बेडरुममध्ये बनियनवर बसलेले असतानाचे व्हिडीओ आले. आम्ही त्याचं भांडवल केलं नाही. आमची नितिमत्ता जागी आहे. आम्हाला कायद्याचं ज्ञान आहे. कुणाच्या घरात वाकून पाहायचं, कोण बनियनवर बसलाय, कोण केस सोडून बसली आहे आणि कोण रडतंय यात आम्हाला रस नाही. त्याला राजकारण म्हणत नाही. त्याला न्याय म्हणत नाही.”

Post a Comment

Previous Post Next Post