प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
नेरळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 201/2022, भा.द.वि. कलम 379 हा मोटार सायकल चोरीचा गुन्हा दि.04/07/2022 रोजी दाखल असून सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,रायगड- अलिबाग कडून समांतर तपास चालू होता.
सदर तपासाचे दरम्यान CCTV. फुटेज तसेच पो.हवा.प्रतीक सावंत, स्था.गु.अ.शाखा, रायगड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे आरोपित यांचा शोध घेवून संशयीत आरोपीचे नावे 1) मुकेश गजनन गोतरणे, वय.33 2) गणेश लक्ष्मण परटोले, वय.23 दोन्ही रा.अंबर्जे ता. शहापूर जिल्हा. ठाणे यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे कडे अधिक तपास करता त्यांनी खालील प्रमाणे 08 मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.
आरोपी अटक
1) मुकेश गजनन गोतरणे, वय.33
2) गणेश लक्ष्मण परटोले, वय.23 दोन्ही रा.अंबर्जे ता. शहापूर जिल्हा. ठाणे.
उघडकीस आलेले गुन्हे
1)नेरळ पोस्टे 155/2022, भादविक 379
2)नेरळ पोस्टे 157/2022, भादविक 379
3)नेरळ पोस्टे 162/2022, भादविक 379
4)नेरळ पोस्टे 172/2022 भादविक 379
5)नेरळ पोस्टे 195/2022 भादविक 379
6)नेरळ पोस्टे 201/2022 भादविक 379
7)नेरळ पोस्टे 208/2022 भादविक 379
8) कर्जत रेल्वे पो.स्टे. 65/2022 भादविक 379.
हस्तगत मालमत्ता
3,24,000/- रु.की.च्या 2 बुलेट, 2 शाईन, 2 युनिकॉर्न, 1 बजाज प्लॅटिना आणि 1 सुपर स्पेलन्डर आशा 8 मोटार सायकल...
*आरोपीत नं.1 याचा पूर्व इतिहास*
आरोपी न.1 च्या विरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत ...
1)वाशिंद पो.स्टे., जि. ठाणे गु.र.115/2021 भादविक 379
2)शहापूर पो.स्टे.,जि. ठाणे
गु.र.60/2021भादविक 392
सदरची कारवाई PSI महेश कदम, पोह/ राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे, तसेच चा.सहा. फौज. देवराम कोरम या पथकाने केली आहे..