आठ महिन्यात दुसरा लाचखोर लाचलुचतच्या जाळ्यात.
प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
कर्जत तालुका भूमी अभिलेख कार्यालयात या आधी आठ महिन्यापूर्वी छाननी लिपीक दत्ता जाधव यांना मालक कैलास पेरणेकर यांच्या कडून १० हजार रुपायाची लाच स्विकारताना रायगड - अलिबाग लाच लुतपत विभागानी अटक करण्यात आले होते.
कर्जत भूमी अभिलेख कर्जत कार्यालयात लोकसेवक म्हणून कार्यरत असलेला दुसरा लाचखोरास रायगड - अलिबाग लाच लुतपत विभागाकडून २५ हजाराची लाच स्विकारताना अटक करण्यात आले आहे. या वरून कर्जत भूमी अभिलेख विभागातील लोकसेवकांना कायदयाचा धाक आहे का? नाही. असा सवाल मात्र जनतेतून उपस्थित होत आहे
कर्जत तालुक्यातील मौजे कळंब येथिल जमिन मिळकतीची मोजणी करण्याकरीता कर्जत भूमी अभिलेख विभागातील लोकसेवक म्हणून भुकरमापक या पदावर कार्यरत असलेले बालाजी रावसाहेब राऊत , वय ३२ वर्षे, यांनी तक्रारदार यांच्या कडे एकून १,५०,०००/-लाख रूपये इतकी लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदार वय ५० वर्ष यांनी दि.११/७/२०२२ रोजी लोकसेवक म्हणून भुकरमापक या पदावर कार्यरत असलेले बालाजी रावसाहेब राऊत यांच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
त्या तक्रारीनुसार दि.१३/७/२०२२ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, भुकरमापक या पदावर कार्यरत असलेले बालाजी रावसाहेब राऊत या लोकसेवकांनी तक्रारदार यांच्या कडून १,५०,०००/ - लाख रुपये इतकी मागणी केल्या प्रमाणे पडताळणी अनुषंगाने बालाजी रावसाहेब राऊत या लोकसेवका विरोधात लाचेचा सापळा आजमावला आसता, भुकरमापक या पदावर कार्यरत असलेले बालाजी रावसाहेब राऊत या लोकसेवकांनी तक्रारदार यांच्या कडून १,५०,०००/ -लाख रुपये लाचेच्या मागणी रक्कमे पैकी २५,०००/ -हजार रूपयाची लाच ही पंच व साक्षीदारांसमक्ष स्विकारताना रायगड - अलिबाग लाचलुचपत विभागाचे पोलिस निरिक्षक रणजित गलांडे, पो.ह/ कौस्तुभ मगर, पो.ना/ विवेक खंडागळे, म.पो.ना/ स्वप्नाली पाटील यांचे पथकाने रंगेहाथ पकडून, बालाजी रावसाहेब राऊत या लोकसेवक यांच्या कडून लाचेची ' स्विकारलेली २५,०००/ - हजाराची रोख रक्कम जम्मा करून लाचखोर लोकसेवक यांना अटक करण्यात आली आहे.
तर याच कर्जत भूमी अभिलेख विभागातील छाननी लिपीक दत्ता जाधव यांना मालक कैलास पेरणेकर यांच्या कडून १० हजार रुपायाची लाच स्विकारताना रायगड - अलिबाग लाच लुतपत विभागानी आठ महिन्यापूर्वी दि.१० डिसेंबर २०२१ रोजी आटक केली असतानाच याच विभागात २५ हजाराची लाच स्विकारताना दुसरा लाचखोर लोकसेवक याला अटक होते. यावरून या विभागातील लोकसेवकांना कायदयाचा धाक आहे का? नाही. असा सवाल मात्र जनतेतून उपस्थित होत आहे.
कर्जत तालुका भूमी अभिलेख कार्यालयात या आधी आठ महिन्यापूर्वी छाननी लिपीक दत्ता जाधव यांना मालक कैलास पेरणेकर यांच्या कडून १० हजार रुपायाची लाच स्विकारताना अटक केली होती.