प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
पेण तालुक्यातील दादर सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वरेडी येथे राहणाऱ्या फिर्यादी लग्नानंतर गरोदर राहिल्याचे समजल्याने तिच्या संमती शिवाय पती, नणंद, सासू यांनी संगनमत करून १६ आठवड्याचा गर्भ नस्ट केल्याची संतापजनक घटना पेण तालुक्यातील जोहे गावात घडली आहे.
ठाणे येथे डेंटल इम्प्लाण्टची या प्रकरणी डॉक्टरा सह, पती व सासूला पोलिसांनी गजाआड केले आहे. डॉ. धुमाळ यांना न्यायालयात हजर केले असता ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील वरेडी येथे राहणाऱ्या महीलेचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पती-पत्नी, सासू-सून मध्ये भांडणे होऊ लागली. मारझोड तसेच उपाशी ठेवून क्रुरतेची वागणूक देण्यात येत होती. लग्नानंतर सदर महिला गर्भवती राहिली. सदरचा गर्भ १६ आठवड्याचा झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांच्या दवाखान्यात उपचारार्थ नेले. यावेळी सदर गर्भवती महिलेची इच्छा नसताना देखील सदर महिलेचा गर्भपात करण्यात आला.
याप्रकरणी डॉ. शेखर धुमाळ यांनी मेडीकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ॲक्ट १९७१ चे पालन न करता गर्भपात घडवून आणल्याने डॉ.धुमाळ यांच्या विरोधात दादर सागरी पोलिस ठाण्यात पिडीत महीलेने गुन्हा दाखल केला.
जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ हा बेकायदेशीररित्या अनेक महिलांचा गर्भपात करतो. त्यामुळे त्या महिलांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा डॉक्टरची मेडिकलची सनद त्वरित रद्द करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या व सामाजिक कार्यकर्त्या प्रवीणा सावंत यांनी केली आहे. तसेच या डॉक्टरावर आरोग्य विभागाने कडक कारवाई करावी अशीही मागणीही त्यांनी केली.
याबाबत दादर सागरी पोलीस ठाणे येथे आरोपी विरोधात गु.र.नं.५७/२०२२ भा.दं.वि.क. ३०८,३१२,३१३, ४९८,(अ), ३४ सह मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ॲक्ट १९७१ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरिक्षक गोविंद पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली कमळाकर भौड पोलिस उपनिरीक्षक व सहा फौजदार जाधव हे करीत आहेत.