प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
त्या साठी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वृक्ष वाटप करण्यात आले.
वृक्षारोपण ही विविध प्रकारच्या झाडांची जाणीवपूर्वक केलेली लागवड होय.शासकीय जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे या साठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने फुले फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत. कालांतराने शासकीय यंत्रणेला या वृक्षारोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या. सध्या भारतातील स्थानिक प्रजातींची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच गैर सरकारी संस्थांचा कल आहे.
उद्देश
वृक्षारोपण केल्याने काय काय फायदे होतील या गोष्टीचा विचार करणार आहोत.
-निसर्गाशी नाते सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
वृक्ष हे निसर्गाची शोभा वाढवत असतात. पर्यावरणाला वृक्षांमुळे सुंदरता प्राप्त होते. वृक्षांमुळे मनुष्याला नेहमी फायदाच होतो.आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्याला समजेल की आपला आपले अस्तित्व राहण्यासाठी वृक्ष किती महत्वाची भूमिका बजावत असतात.आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडते. आपण कधी फिरायला जायचे ठरवले तरी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणाची निवड करतो. आपल्याला आपल्या आजूबाजूचा हिरवागार निसर्ग खूप छान वाटतो.
जर हे वृक्षच नसतील तर ?
भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे वनक्षेत्र कमी होत आहे. कडक उन्हाळा, जागतिक तापमान वाढ, प्रदूषण अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत.पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे.वृक्षारोपण करण्याचे अनेक फायदे आहेत. पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही.वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत.आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत नाहीत तर वृक्षांपासून आपल्याला अनेक फायदे आहेत.वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेतात आणि जीवनावश्यक असा अक्सिजन आपल्याला देतात. ऑक्सिजन नसेन तर आपले पृथ्वीवर जीवनावश्यकच आहे.वृक्ष आपले मित्रच आहेत. भरपूर लोकांचा उदरनिर्वाह हा झाडांमुळे होतो. लोक झाडांची फळे विकून पैसे कमवून आपला उदरनिर्वाह करतात.आपल्या घरातील सुशोभीकरणाच्या बऱ्याचश्या गोष्टी झाडांपासून मिळणाऱ्या लाकडांमधून केल्या जातात.
आपले आरोग्य नीट राहण्यासाठी झाडे आपल्याला स्वछ हवा निर्माण करून देतात.अनेक वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म असतो. औषधी गुणधर्म असलेल्या झाडांच्या पानापासून, मुळांपासून वेगवेगळ्या आजारांवर औषधे मिळतात.वृक्ष हे पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात. मातीची होणारी धूप वृक्षांमुळे खूप कमी होतेवृक्षांमुळे अनेक जीवांचे अस्तित्व आहे. अनेक प्राणी जंगलात राहतात. ही जंगलेच नष्ट झाली तर प्राण्यांचे जगणे कठीण होईलअलीकडे प्रदूषण ही मोठी समस्या आपल्यासमोर उभी आहे. इंधनाच्या ज्वलनामुळे, कंपन्यांनामधी वेगवेगळ्या वायूंमुळे, वृक्षतोडींमुळे जागतिक तापमानवाढ ही समस्या आपल्याला पाहायला मिळते.या विषारी वायूंमुळे अनेक पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.वृक्ष वातावरणातील या विषारी वायूंचा प्रभाव कमी करून हवा स्वछ ठेवतात.
पक्षी झाडांवर आपली घरटी बांधून राहतात.
वातावरणात होत असणारे हे बदल आपले अस्तित्व धोक्यात आणू शकतात. आपल्याला योग्य वेळी पाऊले उचलणे गरजेचे आहे अलीकडच्या काळात वृक्षारोपण करण्याकडे जास्त भर दिला जातो. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे का गरजेचे आहे हे सांगितले जाते.“वृक्षारोपण मराठी निबंध..एका बाजूने शाळा, कॉलेज तसेच अनेक ठिकाणी वृक्षारोपणासाठी अनेक प्रयत्न केले जातात. तर एका बाजूने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे वाढत्या कंपण्यामुळे, शहरीकरणामुळे विकास तर होत आहे परंतु वृक्षतोडसुद्धा होत आहे. वृक्षतोड होत असल्यामुळे जंगले नष्ट होत आहे. प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. आपण फक्त कल्पना करू जर आपल्या आजूबाजूला असलेल्या वृक्षांची संख्या दिवसेनदिवस कमी झाली तर काय होईल?
आपल्याला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळणार नाही. वातावरणात अनेक विषारी वायूंचे प्रमाण वाढून प्रदूषण वाढण्यासाठी मदत होईल. जागतिक तापमानात वाढीच्या समस्येला समोर जावे लागेल.आपण आधीपासूनच बऱ्याच प्रदूषणाचा सामना करत आहे. वृक्षांची संख्या कमी करून आपण प्रदूषण वाढीस मदत करत आहोत. कितीतरी समस्या निर्माण होतील. निसर्गचक्र नीट ठेवायचे असेन आपल्याला वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. आपल्याला शक्य होईल तेवढी वृक्ष आपण लावली पाहिजेत.
वृक्षारोपणाचे अनेक छान प्रकल्प अलीकडे राबविले जातात या प्रकल्पात आपण सहभागी झाले पाहिजे. शाळा , कॉलेजमध्ये मुलांना वृक्षारोपणाचे महत्व सांगितले पाहिजे.आपण एखाद्या एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी किंवा निसर्गरम्य परिसराला भेट देतो तेव्हा तिथे एखादे छानसे झाड लावून तिथल्या सुंदरतेत आणखी भर टाकू शकतो.जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करून आपल्याला जीवनावश्यक ऑक्सिजन वाढण्यास मदत होईल. आपण आपल्यापासून सुरवात करूया, एकतरी झाड लावूया.