आरोपी बासू मातारी याच्या विरोधात माणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला
प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॉफीत गुंगीचे औषध टाकून एका तरुणाने महिलेचे अश्लील फोटो काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अश्लील फोटो काढून महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यासह मुलीसोबत शारिरीक सुखाची मागणी एका नराधमाने केली होती. हे अश्लील फोटो नातेवाईकांकडे आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी कोमटेक एजन्सीच्या गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाने दिली होती. अनंत बासू मातारी असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात माणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनंत बासू मूळचा आसाम येथील आहे. २०१५ पासून बासूने पीडित महिलेला मानसिक त्रास दिला. बासूच्या जाचाला कंटाळून पीडित महिलेने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली. त्यानंतरही बासू पीडितेला त्रास देऊन ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर आरोपी बासूने पीडितेकडून ६ लाख ७० हजार रुपये उकळले. इतकच नव्हे तर पीडितेकडे आणि तिच्या मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. पीडितेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.