प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
मागील आठवड्यामध्ये दांड फाटा येथे अलिबाग गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या पथकाने गावठी जिवंत काडतुसे मुद्देमालासह जप्त केली होती अलिबाग गुन्हे अन्वेषण विभाग पथक नेहमी चर्चेत असून जिल्ह्यात कुठे ना कुठे त्यांच्या धाडी सत्र चालूच आहेत अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला असून अलिबाग गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्वत्र विभागात कौतुकास्पद केले जात असून नागरिकांना सुटकेचा श्वास मिळत आहे
दि.06/07/2022 रोजी Psi महेश कदम यांच्या पथकातील पोहवा/2139 यशवंत झेमसे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम त्याचे गाडीमध्ये गांजा हा मादक पदार्थ घेऊन येणार आहे .
मिळालेल्या बातमीप्रमाणे जुना मुबंई-पुणे रोड वर चौक येथे सापळा लावून एका इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे 5.600 किलो वजनाचा गांजा मिळून आला .
सदर इसम नामे अवदेश चंद्रशेखर वर्मा वय-33 रा. महावीर पेठ कर्जत, ता. कर्जत यास ताब्यात घेतले असून त्याच्यावर खालापूर पोलीस ठाणे येथे गु.र.न. 211/2022 एन.डी. पी.एस.ऍक्ट कलम 8(क) 20(ब) ii प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी
अवदेश चंद्रशेखर वर्मा वय.33 रा. महावीर पेठ, कर्जत, ता.कर्जत जि.रायगड
आरोपीकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
1) 1,12,000/- रुपये किमतीचा 5.600 कीलो वजनाचा गांजा हा मादक पदार्थ
2) 5,00,000/- रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची डिझायर गाडी तिचा आरटीओ नं. MH46/BK1519 असा असलेली
असा एकूण 6,12,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी सपोनि- नागेश कदम , पोउनि महेश कदम, पो.हवा./राजेश पाटील, पो.हवा./ यशवंत झेमसे, पो.हवा./प्रतीक सावंत , पो.हवा./राकेश म्हात्रे चापोहवा/ देवा कोरम यांनी केलेली आहे.