प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
डॉ.सुषमा दिनेश जाधव
(एम.ए.बी.एड.पीएच.डी.)
(सह्याद्री विद्यालय खोपोली येते कार्यरत आहेत
डॉ.सुषमा जाधव यांचा जन्म चौक (खालापूर) या गावी पोळेकर कुटुंबात झाला. त्यांनी आपले माध्यमिक पर्यंतचे शिक्षण चौक गावी पूर्ण केले. पुढील कॉलेजपर्यतचे शिक्षण के एम सी कॉलेज खोपोली येथे पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती खूप बेताची असतानाही शिक्षणाची आवड आणि ध्येय मनाशी बाळगून, पैसे, कमी असताना कंपनीत काम किंवा पडेल ते काम करून येणाऱ्या पैशांतून आपले बी.ए.पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा ओढा शिक्षकी पेशाकडे वळला, आणि यासाठी त्यांनी बी.एड. शिक्षण उल्हासनगर येथून पूर्ण केले. २००२ साली माध्यमिक विद्यालय खोपोली येथे आपल्या शिक्षकी नोकरीस सुरुवात केली विद्यार्थाशी छान संवाद, उत्तम शिकविणे आणि मनमिळावू स्वभावामुळे अगदी कमी वेळात आणि वयात त्या संपूर्ण शाळेत प्रकाशझोतात आल्या. त्यांनी या शाळेत जवळजवळ १४ वर्षे अध्यापण केले.
रायगड जिल्हा खालापूर तालुक्यातील गोरठण बुद्रुक गावच्या डॉक्टर सुषमा दिनेश जाधव यांनी(एम.ए.बी.एड.पीएच.डी)ची पीएचडी पदवी संपादन केली.
जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या *शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर* येथून *पीएच.डी.* प्राप्त करणाऱ्या तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षिका असूनही पीएच.डी. मिळवून शिवाजी विद्यापीठाकडून सन्मान मिळविणाऱ्या डॉ.सुषमा दिनेश जाधव यांच्याविषयी त्यांचे मनोगत.डॉ.सुषमा जाधव यांचा जन्म चौक (खालापूर) या गावी पोळेकर कुटुंबात झाला. त्यांनी आपले माध्यमिक पर्यंतचे शिक्षण चौक गावी पूर्ण केले. पुढील कॉलेजपर्यतचे शिक्षण के एम सी कॉलेज खोपोली येथे पूर्ण केले.
आर्थिक परिस्थिती खूप बेताची असतानाही शिक्षणाची आवड आणि ध्येय मनाशी बाळगून, पैसे, कमी असताना कंपनीत काम किंवा पडेल ते काम करून येणाऱ्या पैशांतून आपले बी.ए.पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा ओढा शिक्षकी पेशाकडे वळला, आणि यासाठी त्यांनी बी.एड. शिक्षण उल्हासनगर येथून पूर्ण केले. २००२ साली माध्यमिक विद्यालय खोपोली येथे आपल्या शिक्षकी नोकरीस सुरुवात केली विद्यार्थाशी छान संवाद, उत्तम शिकविणे आणि मनमिळावू स्वभावामुळे अगदी कमी वेळात आणि वयात त्या संपूर्ण शाळेत प्रकाशझोतात आल्या. त्यांनी या शाळेत जवळजवळ १४ वर्षे अध्यापण केले.
२००४ साली गोरठण बुद्रुक (वावोशी) येथील जाधव कुटुंबामधील श्री.दिनेश जनार्दन जाधव यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. शिक्षणाचे वेड त्यांना स्वस्थ बसू देत न्हवते, लागलीच त्यांनी एम.ए. पूर्ण केले. त्यांना कनिष्ठ महाविद्यालयात शिकवण्याची ओढ लागली. त्यासाठी सेट/नेट परीक्षा देण्यास सुरुवात केली, पण त्यांना पीएच.डी.ची आवड निर्माण झाली आणि त्या त्यासाठी तयारीला लागल्या.
२०१४ साली त्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून पीएच.डी. लेखनिक आणि मौखिक परिक्षा पास झाल्या. त्यांचा *रा.रं.बोराडे आणि रामदरश मिश्र यांच्या कादंबरीतील ग्रामीण जीवनाचा तौलनिक अभ्यास* या प्रबंधाची निवड करण्यात आली. त्यांना मार्गदर्शक म्हणून *डॉ. उदय रामचंद्र जाधव सर* (एम.ए. मराठी पीएच.डी.) प्रोफेसर मराठी विभाग प्रमुख शहाजीराजे महाविद्यालय खटाव (सातारा) यांचे मार्गदर्शन लाभले.
संसाराचा गाडा चालवत असताना एकीकडे शालेय अध्यापण आणि एकीकडे सासर माहेर सांभाळत, सांसारीक गोष्टी, लग्न समारंभ, सुख दुःखात भेटी असे असताना देखील गोरठण बुद्रुक ते कोल्हापूर जवळ जवळ ३५० किलोमिटरचा प्रवास करीत जवळ जवळ आठ वर्षे कठोर मेहनतीच्या जोरावर यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. हे करीत असताना पती दिनेश जाधव यांचे पाठबळ खूप मोलाचे लाभले. त्यांच्या पाठबळामूळे मी या शिखरावर पोहचले असे यांचे म्हणणे आहे.
या अलौकीक यशामुळे त्यांनी आपल्या जाधव कुटुंबाचे, नातेवाईकांचे, गोरठण बुद्रुक गावाचे, छत्तीशी विभागाचे तसेच खालापूर तालूक्याचे नाव हे जिल्हयात, महाराष्ट्रात, भारतात नाहीतर जगात नेऊन ठेवले आहे. त्यांना सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा मिळत आहेत.