प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील :
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील लोणिवली येथे नवीन अंगणवाडी उभारण्यात आली असून या अंगणवाडीचे उदघाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
लोणिवली येथील अंगणवाडी जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने याकडे लक्ष देत त्यांच्या जिल्हा वार्षिक योजना निधीतून ८ लाख ५० हजार रुपये खर्च करून नवीन अंगणवाडी बांधण्यात आली आहे. यामध्ये वर्ग, किचन, स्टोर रूम, शौचालय अशी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना या अंगणवाडीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंगणवाडीत चिमुकले विद्यार्थी शिकत असतात आणि त्यांच्यावर शैक्षणिक संस्कार घडविण्याची ती पहिली पायरी असते. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर आणि विद्यार्थी यांचे अतूट नाते आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांचे लक्ष विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कायम असतो. या अंगणवाडीच्या उभारणीमुळे ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद यावेळी दिले.
या उदघाटन कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच सुवर्णा पवार, माजी सरपंच गुरुनाथ भोईर, संतोष शेळके, सुधीर पाटील, आत्माराम मालुसरे, बबन मालुसरे, मनोज भालेकर, पोलीस पाटील सुभाष पाटील, माजी उपसरपंच संपदा पालव, सदस्या लीलाबाई कातकरी, कांता भालेकर, दर्शना पाटील, बाळाराम पाटील, विभागीय अध्यक्ष सतीश मालुसरे, नाना पाटील, अतिश मालुसरे, रोशन मालुसरे, काशिनाथ अरिवले, संतोष पवार, संदीप उतेकर, मनोहर पवार, मयूर धनावडे, अंगणवाडी सेविका निकीता पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.