रायगड जिल्हा रुग्णालयात आपत्ती सुरक्षा शिबीर संपन्न

 आपल्या कुटुंबावर आपत्ती येऊ नये म्हणून बँक खात्यात दोघांचे जोडून खाते असणे महत्त्वाचे आहे 


प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा :  सुनील पाटील

सरकारी कर्मचाऱ्यांवर अपघाताची आपत्ती आल्यास पत्नीचे अथवा पतीचे नावे खाते काढल्यास कुणाकडे गरज पडताच कोणकडे हात न पसरता आपल्याला पैसे त्वरेने उपलब्ध होऊ शकतात. आपल्या कुटुंबावर आपत्ती येऊ नये म्हणून बँक खात्यात दोघांचे जोडून खाते असणे महत्त्वाचे आहे असे रायगड भूषण आपत्ती सुरक्षा तज्ञ जयपाल पाटील यांनी सांगितले जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी शिकाऊ परीचारिका यांचेसाठी आपत्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर सुहास माने यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर प्रमोद गवई, डॉक्टर गजानन गुंजकर हे व्यासपीठावर होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्तेदीप प्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी जयपाल पाटील याचे स्वागत डॉक्टर सुहास माने यांनी केले, प्रास्ताविकात प्रत्येकाला आपत्ती कशाप्रकारे येते ची माहिती आजचे व्याख्याते जयपाल पाटील यांच्याकडून घेऊन आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे सांगितले.


यावेळी डॉक्टर प्रमोद गवई म्हणाले आपण सर्वजण आपत्ती आलेल्यांची सेवा करतो मात्र आपली व आपल्या कुटुंबाची सेवा कशी करावी याची माहिती जयपाल पाटील देतात ते अतिशय महत्त्वाची असून त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपण शांतपणे घेऊन त्यांची माहिती इतरांना देऊ द्या . यावेळी जयपाल पाटील यांनी घरातील गॅस विजेची साधने यांची कशी काळजी घ्यावी हे सांगितले, मोठ्या संख्येने महिला वर्ग असल्याने घरून कामावर येताना व जाताना सुट्टीच्या दिवशी आपणावर कोणताही प्रसंग आल्यास महाराष्ट्र पोलिसांचे 112 क्रमांक चा वापर करून पहावे. यावेळी फोन करताच २० मिनीटात अलिबाग पोलीस ठाण्यावरून महिला पोलीस हवलदार शरदा भगत,पो.ह. सुनिल फड, प्रकाश हंबीर हे उपस्थित झाले, तर अपघात व बाळंतपणासाठी 108 रुग्णवाहिका व 102 रुग्णवाहिकेचा वापर मोबाईलचे धोके आणि सुरक्षा यावेळी उपस्थितांना सांगितले या कार्यशाळेमध्ये 150 परिचारिका कर्मचारी हे उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यास मेट्रन साळवी, थळे,मोकल, पाटील,बावरे,जोशी,राउत,कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेट्रन नेहा चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन मेट्रन सिमा पाटील यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post