प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा : सुनील पाटील
सुदाम लक्ष्मण धारपवार वय ४८ वर्ष राहणार देवशेतवाड़ी बापदेव जवळ विणेगाव, पोळ, ता. खालापूर जि. रायगड हा मनोरुग्ण असून वेडयाच भरात तो दिनांक ०९/०२/२०२२ रोजी दुपारी ०१:०० वा. चे सुमारास कोणासही काही एक न सांगता कोठेतरी निघुन गेलेला आहे तो आज रोजी पर्यंत परत आलेला नाही .
या बाबतची तक्रार त्यांची पत्नी सौ सिमा सुदाम धारपवार यांनी खालापूर पोलीस ठाणे जिल्हा रायगड येथे केली आहे.
मिसिंग व्यक्तीचे वर्णन पुढील प्रमाणे -
नाव -सुदाम लक्ष्मण धारपवार वय ४८ वर्षे रंग निमगोरा, उंची १७२ सेमी, अंगाने सडपातळ, चेहरा गोल डोळे काळे केस काळे साधारण पांढरे,कपाळावर गंध लावलेले, ओळख खून कपाळावर चामखिळ निमगोरा रंगाचा, अंगात लाल रंगाचा टिशर्ट, काळे रंगाची फुल पँट असे आहे.