हिंदुस्थान इंसेक्टिसाईड लिमिटेड रसायनी हे भारत सरकारची कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेते सुनील गोगटे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला.

मंत्री महोदयांनी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरत कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या.

प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

एचआयएल ही कंपनी भारत सरकारने निरगुंतवणूक  कार्यक्रमांतर्गत बंद करण्याचा निर्णय घेत आहे आणि कामगारांच्या सर्व सुविधा बंद करत आहेत. या कामी केंद्र सरकारकडून न्याय मिळवून द्यावा, असे निवेदन वजा मागणी कामगारांच्या तीन युनियननी भाजप नेते सुनील गोगटे यांचेकडे  केली. सुनील गोगटे  यांनी त्वरित लक्ष घालून भाजपच्या  वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व केमिकल उद्योग मंत्री मन्सूख  मांडवीया  यांच्याकडे फेब्रुवारीमध्ये मीटिंग लावली. त्यात मंत्री महोदयांनी कंपनी बंद होऊ देणार नाही, तसेच  कामगारांच्या इतर समस्या सुद्धा दूर करू, असे आश्वासन दिले.

काही काळ व्यवस्थित गेला आणि पुन्हा जुन पासुन टॉप मॅनेजमेंट यांनी कामगारांना द्यायला पैसे नाहीत इतर बस, कँटीन, वैद्यकीय सुविधा बंद केल्या. तरी सर्व कामगार पगार न मिळता सुद्धा कंपनी चालू राहावी कंपनीला फायद्या व्हावा म्हणून काम करत राहिले, परंतु मॅनेजमेंट अजिबात कामगारांना दाद देत नव्हती म्हणून पुन्हा त्यांनी गोगटेची भेट घेऊन दिल्ली येथे मंत्री महोदय कंपनीचे अधिकारी आणि कामगार यांची जॉईंट मिटींग घ्यावी अशी विनंती केली. कामगारांच्या सांगण्यावरून सुनील गोगटे यांनी 10 कामगार प्रतिनिधीना घेऊन दिल्ली येथे खासदार अनिल बोंडे यांची  भेट घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली. त्याचप्रमाणे ना. कपिल पाटील आणि ना. नारायण राणे यांनासुद्धा निवेदन दिले. खासदार बोंडे यांच्या पुढाकाराने मंत्री मांडवीया यांच्या दालनात बोंडे, गोगटे, मॅनेजिंग डायरेक्टर कामगार यांची मीटिंग  झाली. त्यात मंत्री महोदयांनी मॅनेजिंग डायरेक्टर यांना कामगारांसोबत चर्चा  करून  त्यांचा स्थानिक समस्याचे  समाधान  त्वरित करून मला  रिपोर्ट द्या असा आदेश  दिला.

बाकी कंपनीचा निर्णय आम्ही लवकरच करू असे सांगितले. लगेच कामगारांच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करून  त्यांच्या सतरा मागण्या मान्य केल्या. त्याचे मिनिट्स बनवून मंत्री महोदयांना सादर केले. या वेळी राहुल मसणे, सर्वेश गोगटे आणि अक्षय सर्वगोड उपस्थित होते.

यामुळे सर्व कामगार खूप आनंदित होत खासदार बोंडे, सुनील गोगटे यांच्यामुळे आमचे प्रश्न मार्गी लागले असल्याचे सांगितले. तसेच ना. कपील पाटील, ना. नारायण राणे यांचेसुद्धा आभार मानले. वेळोवेळी याकामी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मदत झाल्याचे नमूद केले. लवकरच कंपनी व्यवस्थित चालेल आणि शेकडो कामगारांची रोजीरोटी चालेल त्यामुळे कामगारांमध्ये आनंद होता.

Post a Comment

Previous Post Next Post