जिल्हा परिषदा व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर



प्रेस मीडिया लाईव्ह :

रायगड जिल्हा : सुनील पाटील

     महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम ,1961 मधील कलम 12 उपकलम(1),कलम 58(1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हापरिषदा व पंचायत समित्या(जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम,1996 नुसार अनुक्रमे जिल्हापरिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेवून अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणी उर्वरीत स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.त्याकरीता आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे :- 

      जिल्हा परिषदेचे नाव/पंचायत समितीचे नाव : रायगड जिल्हा परिषद, सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण-जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन सभागृह, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

         पंचायत समिती, अलिबाग : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- जंजिरा सभागृह, पोलीस मुख्यालय अलिबाग, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

         पंचायत समिती, मुरुड : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- नानासाहेब धर्माधिकारी सभागृह पंचायत समिती  कार्यालय दरबार हॉल मुरुड, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

         पंचायत समिती, पेण : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- तहसिलदार कार्यालय  सभागृह पेण, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

         पंचायत समिती, पनवेल : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

         पंचायत समिती, उरण : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- पंचायत समिती सभागृह,  उरण, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

         पंचायत समिती, कर्जत : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, चार फाटा कर्जत येथील सभागृह, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

         पंचायत समिती, खालापूर : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- सरनौबत नेताजी पालकर सभागृह, तहसिल कार्यालय खालापूर,आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

         पंचायत समिती, रोहा : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- कै.द.ग.तटकरे सभागृह पंचायत समिती रोहा,आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

       पंचायत समिती, सुधागड : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- श्री.बल्लाळेश्वर देवस्थान, भक्त निवास क्र.1 सुधागड, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

        पंचायत समिती, माणगाव : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- मध्यवर्ती प्रशासकीय भवन सभागृह,पहिला मजला,तहसिल कार्यालय माणगाव, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

        पंचायत समिती, तळा : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, पहिला मजला, पंचायत समिती कार्यालय तळा, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

        पंचायत समिती, महाड : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- बहुउददेशीय सभागृह,डॉ.  बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड,ता.महाड, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

        पंचायत समिती, पोलादपूर : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- कै.बॅ.नाथ पै.सभागृह पंचायत समिती कार्यालय पोलादपूर‍, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

     पंचायत समिती, श्रीवर्धन : सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- मध्यवर्ती प्रशासकीय भवन, पहिला मजला, तहसिल कार्यालय श्रीवर्धन, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

     पंचायत समिती, म्हसळा: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालय म्हसळा, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

          जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या  रहिवाशांची सदर सभेस हजर  राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post