प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी स्वप्नील बापट (दै. आज का आनंद) यांची तर सरचिटणीसपदी 'सकाळ`चे बातमीदार पांडुरंग सरोदे यांची निवड झाली आहे.नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे रविवारी (17 जुलै) झालेल्या वार्षिक निवडणुकीत नव्या कार्यकारिणीची एक वर्षासाठी निवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी गणेश कोरे (ॲग्रोवन) आणि संदीप पाटील (नवराष्ट्र) यांची तर, खजिनदार पदावर अभिजित बारभाई (महाराष्ट्र टाइम्स) यांची निवड झाली. प्रसाद जगताप (पुढारी) आणि रूपेश कोळस (केसरी) हे चिटणीसपदी बिनविरोध निवडून आले. सावळे अनिल (सकाळ), अविनाश पोफळे (ॲग्रोवन), अमोल बोरसे (केसरी), प्रसाद पानसे, दिगंबर शिंगोटे, आदित्य तानवडे (महाराष्ट्र टाइम्स), सचिन गोरे (सामना), धीरज ढगे (एएनआय वाहिनी), गणेश खळदकर (पुढारी), नीलेश चौधरी (पुण्यनगरी) यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली. प्रताप परदेशी, स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.