प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे : गुरूवार दिनांक २१/०७/२०२२ रोजी वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तसेच शुक्रवार दिनांक २२/०७/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी या बाबत नोंद घेऊन सहकार्य करावे अशी विनंती पुणे मनपा .पाणी पुरवठा विभाग कडून करण्यात आली आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार,दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.