अमृत महोत्सवानिमीत्त हडपसर येथे ‘नगर वन उद्यान’ उभारणीचा शुभारंभ


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे, दि. ८: ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ निमित्ताने केंद्र शासन पुरस्कृत योजनेतून पुणे वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत महंमदवाडी तसेच हडपसर येथे ‘नगर वन उद्यान’उभारणीचा शुभारंभ पुणे वनवृत्ताचे मुख्य वनंसरक्षक एन. आर. प्रविण यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्ताने केंद्र शासन पुरस्कृत ‘नगर वन उद्यान’ उभारण्याची योजना आहे. या अनुषंगाने पुणे वन विभागाच्या अखत्यारित असलेले पुणे वन परिक्षेत्र पुणे अंतर्गत महंमदवाडी व हडपसर येथे वन उद्यान उभारणी करण्यात येत आहे. या उद्यानात ‘हरियाली महोत्सव’ अंतर्गत सुमारे ८५० वृक्षांची लागवड आज करण्यात आली.

बिशप स्कूल उंड्री आणि सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालय हडपसर येथील विद्यार्थी तसेच आनंदवन फाऊंडेशन, ग्रीन नंदनवन या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी या वृक्षारोपणात सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना वृक्ष संवर्धनासंदर्भात तसेच पुणे वन विभाग राबवत असलेले ‘क्लिन हिल्स, ग्रीन हिल्स’, वनमहोत्सव, हरियाली महोत्सव आदी उपक्रमांविषयी माहिती देवून सहभागाविषयी आवाहन करण्यात आले. 

कार्यक्रमाला कालिंदाताई पुंडे, पुणे वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वन परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस तसेच वनपाल विशाल यादव, मंगेश सपकाळे, सिमा मगर, मनोज पारखे यांच्यासह पुणे वनपरिक्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post