नवीन शैक्षणिक वर्षास उत्साहात प्रारंभ
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :भारती अभिमत विद्यापीठाच्या 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट( आयएमईडी) मध्ये एमबीए,एमसीए अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. १८ जुलै रोजी ११ दिवसीय इंडक्शन प्रोग्रामचा प्रारंभ करण्यात आला. २९ जुलै पर्यंत हा इंडक्शन प्रोग्रॅम चालणार आहे. विद्यार्थ्यांच्या नव्या तुकडीच्या पायाभरणीसाठी शैक्षणिक,कारकिर्दविषयक,समुपदेशन आणि क्रीडा विषयक सत्रांचे आयोजन या कालावधीत करण्यात आले आहे.
सोमवारी पहिल्या दिवशी झेन्सार टेक्नॉलॉजीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रसाद देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ.योगेश पवार,डॉ.अनिर्बन सरकार यांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली.भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते . एम सी ए विभागाचे संचालक डॉ. अजित मोरे,डॉ सोनाली धर्माधिकारी,डॉ सत्यवान हेम्बाडे,दीपक नवलगुंद,डॉ प्रवीण माने,डॉ प्रवीण माने,डॉ आर महाडिक,डॉ श्वेता जोगळेकर,डॉ स्वाती देसाई यांच्यासह व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी ,प्राध्यापक उपस्थित होते
२९ जुलै पर्यंत चालणाऱ्या या इंडक्शन प्रोग्रॅम मध्ये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,व्हेरितास टेक्नॉलॉजीजचे वरिष्ठ संचालक संजीव सोमाणी , सिअर्स आय एन सी च्या वरिष्ठ व्यवस्थापक देविका थोरात,राहुल जोशी,पूजा आडकर,अनुपमा जवळगी,अमित पटेल,प्रमिती अरोरा,आसावरी भावसार,डॉ पवन आगरवाल,बिनीत सिंग,अश्विन नारनवरे,दीपक नवलगुंद,डॉ भारती जाधव,डॉ श्रद्धा वेर्णेकर,आनंद मुन्शी यांचीही सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
मराठी, हिंदी न्यूज पोर्टल .. वाचत रहा
सोमवारी डॉ.सचिन वेर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच कारकिर्दीच्या संधींची माहिती दिली .ते म्हणाले , 'आयएमईडी च्या प्लेसमेंट ड्राइव्हला कंपन्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे .कोरोना काळातील दोन वर्षानंतर जोमाने शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक जगातील अद्ययावत ज्ञान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील नवी क्षितिजे गाठण्यासाठी मार्गदर्शन घेऊन यशस्वी व्हावे ', भारती विद्यापीठाच्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला.